भारतात पहिल्यांदाच ‘तो’ होणार ‘आई’, ट्रान्सजेंडर कपलने शेअर केले फोटो 

Countrys first transman pregnancy Ziya Paval shares male partners maternity photoshoot pics

केरळमधील ट्रान्सजेंडर कपल जिया आणि जहाद यांनी सोशल मीडियावर आपण आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता तुम्हाला वाटलं असेल यात काय नवलं आहे, पण तसं नाही. या कपलचं वेगळेपण म्हणजे या दोघांनी लिंग परिवर्तन केलं आहे. यातील झिया पुरुष म्हणून जन्माला आला होता पण तो आता सर्जरी करुन स्त्री झाला आहे. तर स्त्री म्हणून जन्माला आलेली जहाद आता सर्जरीनंतर पुरुष झाली आहे. हे जोडपं आता एका बाळाला जन्म देणार आहे. दोघांनी आपल्या प्रेग्नेंसीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात जहाद स्त्रीची पुरुष झाली आहे, असे असले तरी ती गर्भवती आहे, असं फोटोत दिसतंय.

आता मार्चमध्ये त्यांच्या बाळाचा जन्म होईल, असं सांगितलं जात आहे. जिया आणि जहाद हे दोघं गेल् गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहतात. दरम्यान भारतात एक ट्रान्समॅन गर्भधारणा करणार असल्याची ही पहिली घटना आहे. कोझीकोडमधील वैद्यकीय कॉलेजच्या डॉक्टरांच्या एका पथकाने म्हटलं की, गर्भधारणा करणाऱ्या जोडप्याला कोणतीही शारिरीक अडचण नाही. दोघांनी लिंग परिवर्तन केलं आहे. पण जहाद स्त्रीची पुरुष झाली तेव्हा तिचे स्तन काढून टाकण्यात आले पण तिच्या शरीरात गर्भपिशवी कायम आहे.  तसेच लिंग परिवर्तन करण्यापूर्वी जहादने गर्भधारणा केली केली होती त्यामुळे हे शक्य झाल्याचं डॉक्टरांच मत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ziya Paval (@paval19)

जियाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की,  मी जन्माने किंवा शरीराने महिला नव्हते, माझ्यात एक स्त्री होती. तिचं स्वप्न होत की माझंही एक बाळ असावं आणि ते मला आई म्हणावं.  दरम्यान जन्माला येणाऱ्या बाळा हे जोडपं मिल्क बँकेतून दूध पाजलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ziya Paval (@paval19)

ट्रान्सजेंडर कपलने एका बाळाला दत्तक घेण्याची तयारी केली होती, मात्र भारतात बाळ दत्तक घेण्याची पूर्ण प्रक्रिया अतिशय किचकट आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं त्यांच्यासमोर आव्हान होतं. ट्रान्सजेंडर कपलला हे अडचणीचं असल्याने अखेर त्यांनी निर्णय बदलला.


येत्या रविवारी होणाऱ्या सकल हिंदू मोर्चाचे चित्रीकरण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश