बिहारमध्ये देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण, सोनं काढण्यासाठी खोदकामाला होणार सुरुवात

country's largest gold mine discovered in Bihar will begin excavations
बिहारमध्ये आढळली देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण, खोदकामाला होणार सुरुवात

सोन्याचं आकर्षण सर्वानाचं असत तसेच भारतात तर प्रत्येक शुभकार्यात किंवा लग्न सोहळ्यात मोठया प्रमाणांवर सोनं वापरलं जातं. सर्वानांच सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. पण सध्याचा सोन्याचा भाव बघता सोन्याचे दागिने घालण्याची हौस असलेल्या मंडळींना सोनं विकत घेता येत नाही. किंवा प्रत्येकालाच सोन्याचे दागिने विकत घेणं शक्य नसतं. देशातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीचं खोदकाम सुरु झालं आहे. भारत देशातील एकूण सोन्यापैकी ४४ % सोनं हे केवळ बिहार राज्यात असल्याचे सांगितले जात आहे.

बिहार राज्यामधील जमुई जिल्ह्यात सोनं काढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हि खान देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे असं म्हटलं जातंय. या खाणीतील सोनं काढण्याच काम बिहार राज्यसरकारकडून करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे या खाणीचं खाणकाम करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व परवाने बिहार राज्य सरकार कडून देण्यात आले आहेत. बिहारच्या जमुई जिल्ह्यात तब्बल २२२. ८८ मिलियन टन सोन्याचं भांडार आहे. असं भारतीय भूवैज्ञानिक यांच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

बिहार मधल्या जमिनीतून सोनं बाहेर काढण्यासाठी खाण व भूवैज्ञानिक विभाग त्याच प्रमाणे राष्ट्रीय खनिज विकास निगमसह आणखी काही संस्था संयुक्तपणे काम करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. बिहार जिह्ल्यातील करमाटिया आणि काही भागात सोन असल्याची माहिती मिळाली आहे. असं आयुक्त हरज्योत कौर बम्हरा यांनी सांगितले आहे. पुढील महिन्याभरात राज्य सरकारकडून या भागांमध्ये सोन्याचा प्राथमिक शोध सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय संस्थेशी व अन्य काही संस्थांशी सामंजस्यपूर्ण करार करून, काही भागांत सामान्य स्तरावरही शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे असं हरज्योत कौर यांनी सांगितलं.

बिहार राज्यात देशातील सर्वाधिक सोन्याच्या खाणी असल्याची माहिती केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभा अधिवेशनातच दिली होती. भारत देशात एकूण जेवढं सोनं आहे त्या सोन्याच्या तुलनेत 44 टक्के सोनं हे एकट्या बिहार राज्यामध्ये असल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी लेखी स्वरुपात दिली होती. त्यामुळे या खाणकामात सोनं सापडलं तर आपल्या देशात नक्कीच सोन्याचे दिवस येतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे सोन्याची आवड असणाऱ्यांना सोनं खरेदी करणं शक्य होईल. जर सोन्याच्या खाणीचे खोदकाम पूर्ण झाले तर या पुढे भारतीयांना सोनं घेणं किंवा सोन्याचे दागिने तयार करणं शक्य होईल.


हेही वाचा : Sidhu Moose Wala murder: सिद्धू मूसेवालाच्या हत्याकांडातील आरोपींचे सलमान खानशी कनेक्शन