घरताज्या घडामोडीकरोना व्हायरसचा फटका; रिसेप्शन करावे लागले व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

करोना व्हायरसचा फटका; रिसेप्शन करावे लागले व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

Subscribe

सध्या जगात करोना व्हायरसबद्दल सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता भारतात प्रवेश केला आहे. तसंच या व्हायरसची जगभरात दहशत पसरली आहे. आतापर्यंत चीनमधील ३० हजार लोक करोना व्हायरसने ग्रस्त असून सुमारे ६०० लोकांची दुर्देवी मृत्यू झाला आहे. या करोना व्हायरसमुळे चीनमध्ये प्रवास करणे देखील कठीण झालं आहे. त्यामुळे सिंगापूरमध्ये स्थायित असलेल्या चिनी जोडप्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रिसेप्शन सोहळात पार पडला आहे. त्या जोडप्याने आपल्या चीनमध्ये असलेल्या नातेवाईकांना एकत्र बोलावून व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्याद्वारे रिसेप्शन सोहळा साजरा केला.

या जोडप्याचे नाव जोसेफ येव आणि कांग टिंग असं आहे. हे जोडप लग्नाच्या काही दिवसांनंतर सिंगापूर स्थायित झाले होते. त्यांना रिसेप्शन सोहळा हा चीनमध्ये नातेवाईकांसोबत साजरा करायचा होता. मात्र करोना व्हायरस पसरल्यामुळे ते जोडपे चीनला जाऊ शकले नाही. तसंच चीनमधले नातेवाईक हे पण सिंगापूरमध्ये येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रिसेप्शन करण्याचा निर्णय घेतला. या जोडपाचे चीनमधील नातेवाईक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सिंगापूरमधील रिसेप्शन पाहू शकले.

- Advertisement -

चिकनमुळे करोना व्हायरस होत नाही

समाज माध्यमांवर करोना या व्हायरसचा ब्रॉयलर्स कोंबड्यांमध्ये प्रादुर्भावाच्या बनावट पोस्ट्स फिरत असून शास्त्रीयदृष्ट्या यास कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी दिले आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने करोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवांना शास्त्रीय माहितीद्वारे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – ‘त्यां’चं ऐकलं असतं, तर चीनमध्ये करोना पसरलाच नसता; अखेर करोनानंच घेतला त्यांचा जीव!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -