पोलिसांना म्हणाले आजारी बाळ आहे, मात्र, ते दृश्य पाहून पोलीसच हडबडले

एका जोडप्याने अनोखी शक्कल लढवल्याची घटना विशाखापट्टणममध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.

private hospital hidden information of death of corona infected child in pune

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन असतानाही काही लोकं लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडण्यासाठी काहीना काही शक्कल लढवत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना विशाखापट्टणममध्ये घडली आहे.

बाळाच्या जागी निघाले चक्क हे

लॉकडाऊनमध्ये एका जोडप्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. हे जोडपे दुचाकीवरुन बाळाला घेऊन निघाले होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांनी आपले बाळ आजारी असून त्याला रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र, त्यावेळी पोलिसांना या जोडप्यांच्या हालचालीवरुन संशय आला. त्यामुळे पोलिसांनी बाळाच्या अंगावरील कापड काढण्यास सांगितले. हे पाहून पोलिसांना देखील धक्काच बसला. कारण बाळाच्या जागी चक्क बाहुली असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी या जोडप्याकडे चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी बाहुलीला आजारी बाळ केल्याचे कबूल केले. तसेच लॉकडाऊनमध्ये आम्हाला प्रवास करायचा होता. त्यामुळे आम्ही असे केले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.


हेही वाचा – Video : चक्क चेंडूने नारळ फोडला; आरपी सिंहने भेटायलाच बोलावले