Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग बाप रे बाप, कारच्या बोनेटवर आला साप आणि...

बाप रे बाप, कारच्या बोनेटवर आला साप आणि…

साप गाडीच्या विंडस्क्रिनवर आल्यानंतर जे काही झाले ते पाहून दोघेही हैराण झाले.

Related Story

- Advertisement -

सध्या हिवाळ्याचा मोसम सुरु आहे. या दिवसात एकमेकांसोबत वेळ घालवायला सर्वांनाच आवडते. आपल्या पार्टनर सोबत लाँग ड्राईव्हला जाणे ही प्रत्येकालाच आवडणारी गोष्ट आहे. सुंदर वातावरणात सुखद क्षण घालवत असताना मध्ये कोणी ना कोणी येतच असतात. कधी काही माणसे असू शकतात किंवा काही कामे. मात्र तुमच्यामध्ये एक भला मोठा साप आला तर तुमचे काय होईल. असाच एक प्रकार ऑस्ट्रेलियामधून समोर आला आहे. या प्रकारानंतर दोन्ही कपलची चांगलीच झोप उडाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ क्वीन्सलँडमध्ये नवरा बायकोचे आपल्या रोमँटिक लाँग ड्राईव्हच्यामध्ये गाडीच्या विंडस्क्रिनवर साप आल्याची घटना घडली आहे. साप गाडीच्या विंडस्क्रिनवर आल्यानंतर जे काही झाले ते पाहून दोघेही हैराण झाले.

द ऑस्ट्रेलियनने दिलेल्या वृत्तानुसार, मेलिसा हडसन आणि रॉडने ग्रिग्ज हे त्यांच्या कारमधून लॉन्ग ड्राइव्हला चालले होते. प्रवासात अचानक त्यांच्या गाडीवर बोनेटवर पायथन साप आला. त्यानंतर पायथन साप बोनेटमधून बाहेर पडून ड्राईव्हरच्या सीटवर येण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तो गाडीच्या साईड मिररवर येऊनही आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. हा संपूर्ण थरार मेलिसा आणि रॉडने त्यांच्या कॅमेरात कैद केला.

- Advertisement -

मेलिसा ही तिचा नवरा रॉडने ग्रिग्जला गाडी चालवताना गाडी आणि रस्त्यावर लक्ष द्या अशा सूचना देत होती. त्यांच्या छान रोमँटिंक लाँग ड्राईव्हला सुरुवात झाली होती. तितक्यातच गाडीच्या बोनेटवर पायथन साप येऊन आदळला. दोघेही प्रचंड घाबरले होते. साप गाडीच्या दुसऱ्या दिशेने निघून गेला तरिही दोघेही घाबरुन गाडीतच बसून होते. पुढे जाऊन त्यांनी गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला काम करत असलेल्या एका माणसाने त्यांनी मदत केली. त्याने ट्रॅफिक कंट्रोलरच्या मदतीने सापाला पळवून लावले आणि नवरा बायकोंची सुटका केली. दोघांनीही त्या माणसाचे मनापासून आभार मानले.


हेही वाचा – दिव्यांग मराठी तरुणाची जिद्द, सर केला लिंगाणा किल्ला

- Advertisement -

 

- Advertisement -