गुटखा खाऊन वकील पोहोचला कोर्टात; न्यायालयाने ठोठावला दंड

सदाफ आफरीन नावाच्या व्यक्तीने सोशल मिडियावर हा व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरु असल्याचे दिसत आहे. वकीलांचा युक्तिवाद सुरु आहे. युक्तिवाद सुरु असताना न्यायाधीशाचे एका वकीलाकडे लक्ष जाते. न्यायाधीश त्या वकीलाला ब्रश करुन येण्याचा सल्ला देतात.

नवी दिल्लीः सोशल मिडियावर एक व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यात एक वकील गुटखा खाऊन न्यायालयात गेलेला दिसतो आहे. यावरुन न्यायालयाने त्या वकीलाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सदाफ आफरीन नावाच्या व्यक्तीने सोशल मिडियावर हा व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरु असल्याचे दिसत आहे. वकीलाचा युक्तिवाद सुरु आहे. युक्तिवाद सुरु असताना न्यायाधीशाचे एका वकीलाकडे लक्ष जाते. न्यायाधीश त्या वकीलाला ब्रश करुन येण्याचा सल्ला देतात.

तुम्ही पान खाल्ले आहे का?, असा प्रश्नही न्यायाधीश त्या वकीलाला विचारतात. त्यावेळी तेथील अन्य वकील सांगतो की, त्यांनी पान नाही गुटखा खल्ला आहे. यावरुन न्यायाधीश संतप्त होतात. त्या वकीलाला खडेबोल सुनावतात. त्यावेळी तो वकील न्यायाधीशांना सॉरी सॉरी बोलताना दिसत आहे. नंतर न्यायाधीशांंनी त्या वकलीला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. मात्र हे प्रकरण नेमके कोणत्या कोर्टात झाले आहे हे त्या व्हिडिओवरून स्पष्ट होत नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, सुनावणी सुरु असताना अशा प्रकारे चित्रिकरण करणे हाही गुन्हा आहे.

न्यायालयात गुटखा, पान खाऊन जाण्यास मनाई आहे. वकीलाने असे कृत्य केले तर त्याच्यावर न्यायालयाच्या अवमानतेचीही कारवाई केली जाऊ शकते. न्यायालयाची स्वच्छता व न्यायालयाची गरीमा अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक न्यायालयात तसे फलकही लावले जातात. गुटखा, पान खाऊन थूंकू नये. धुम्रपान करु नये, असे न्यायालय परिसरात ठिकठिकाणी लिहिलेले असते. एवढेच काय तर न्यायालयाच्या प्रवेशद्वाजवळच प्रत्येकाची तपासणी होते. कोणा जवळ गुटखा, पान किंवा अन्य व्यसनाची गोष्ट आढळल्यास ती जप्त केली जाते. असे असतानाही न्यायालयात तो वकील गुटखा कसा घेऊन गेला असा प्रश्न उपस्थित होतो.

महत्त्वाचे म्हणजे न्यायालयात शांतता राहावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील काही कोर्ट रुममध्ये प्लास्टिकची पिशवी घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली होती. आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल फेक केल्याच्या घटनाही मध्यतंरी घडल्या होत्या. त्यामुळे काही न्यायालयात आरोपींना चप्पल घालून येण्यासही मनाई करण्यात आली आहे. न्यायालयाच्या सुरक्षेसाठी सदैव तेथे पोलिसांचा फौजफाटा तैनात असतो.