Homeदेश-विदेशCourt Notice to Rahul Gandhi : जातनिहाय जनगणनेबाबतच्या वक्तव्यावरून राहुल गांधींना नोटीस

Court Notice to Rahul Gandhi : जातनिहाय जनगणनेबाबतच्या वक्तव्यावरून राहुल गांधींना नोटीस

Subscribe

हिंदू महासभेचे मंडळ अध्यक्ष पंकज पाठक यांनी याबाबत बरेली न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. आता यावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर 7 जानेवारीला सुनावणी होणार आहे. याचअनुषंगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

(Court Notice to Rahul Gandhi) लखनऊ : संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणात काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर एफआयआर नोंदवला गेला असतानाच, आता उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हा न्यायालयाने एका वेगळ्या प्रकरणात त्यांना नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान जातनिहाय जनगणनेबाबत केलेल्या विधानाशी संबंधित प्रकरणात राहुल गांधी यांना 7 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (Notice to Rahul Gandhi regarding caste wise census)

जातनिहाय जनगणनेसंदर्भात राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे देशात गृहयुद्ध सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही आधी त्यांच्याविरुद्ध खासदार-आमदार न्यायालयात खटला दाखल केला. पण तो फेटाळण्यात आला. यानंतर आम्ही जिल्हा न्यायालयात गेलो आणि तिथे आमचे अपील मान्य करण्यात आले. न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून 7 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे, असे याचिकाकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते पंकज पाठक यांनी सांगितले.

हेही वाचा – Atul Subhash Suicide Case : निकिताची आई बनली मंथरा, सुभाष आत्महत्याप्रकरणाची दुसरी बाजू

सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण करण्याबाबत राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान आश्वासन दिले होते. ज्यांची लोकसंख्या जास्त असून त्यांच्याकडे संपत्ती कमी असल्यास, कमी लोकसंख्या असतानाही ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे, त्यांच्याकडून ती घेऊन कमी संपत्ती असलेल्यांना वाटा दिला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावेळी या वक्तव्याला फार मोठा विरोध झाला होता. भाजपाने तो प्रचाराचा मुद्दा बनवला होता. जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारे राहुल गांधी संपत्तीच्या विभाजनाचा मुद्दा मांडत असल्याचे भाजपाने तेव्हा म्हटले होते. एका विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी राहुल गांधी अशी विधाने करतात, असाही आरोप त्यावेळी करण्यात आला होता.

हिंदू महासभेचे मंडळ अध्यक्ष पंकज पाठक यांनी याबाबत बरेली न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. आता यावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर 7 जानेवारीला सुनावणी होणार आहे. याचअनुषंगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut Vs Modi Govt : लोकशाहीच्या बाबतीत भारत कंगाल, संजय राऊत यांचा घणाघात


Edited by Manoj S. Joshi