घरदेश-विदेशइम्रान खान यांना कोर्टाचा दिलासा, तूर्तास अटक नाही

इम्रान खान यांना कोर्टाचा दिलासा, तूर्तास अटक नाही

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांना अटक वॉरंट प्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा दिला आहे. मंगळवारी (१४ मार्च) पीटीआय समर्थक आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींमधील दिवसभर चाललेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लाहोर उच्च न्यायालयाने आज (१५ मार्च) सकाळी 10 वाजता पोलीस कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांना 24 तास संघर्ष करावा लागला, मात्र पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थकांच्या गदारोळामुळे हे शक्य झाले नाही. इम्रान खान यांना दिलासा मिळताच पीटीआय समर्थकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. लाहोरमधील जमान पार्कबाहेर कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.

- Advertisement -

तत्पूर्वी, मंगळवारी इम्रान खान यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना बुधवार सकाळपर्यंत यश मिळाले नाही. तोशाखाना प्रकरण आणि महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस आणि एजन्सी यांनी प्रयत्न सुरू केले होते, मात्र त्यांना पीटीआय कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. या विरोधामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली.

- Advertisement -

पोलीस आणि पीटीआय समर्थकांमध्ये चकमक
इम्रान खान यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला आहे. यावेळी पोलिसांनी पाण्याचा फवारा मारला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. याला विरोध करताना पीटीआय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यादरम्यान अनेक जण जखमी झाले.
पीटीआयने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले की, अधिकाधिक कामगार जमान पार्कमध्ये पोहोचत आहेत. आघाडी सरकारचे ‘नापाक मनसुबे’ यशस्वी होऊ न देण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये इम्रान खान गॅस मास्क घालून पक्ष समर्थकांना संबोधित करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इम्रानच्या घराबाहेरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -