Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश आफताबच्या नार्को चाचणीला परवानगी, 'या' दिवशी होणार पोलखोल

आफताबच्या नार्को चाचणीला परवानगी, ‘या’ दिवशी होणार पोलखोल

Subscribe

फताबने रागाच्या भरात हे कृत्य केलं असलं तरीही त्यांच्यात नियमित वाद सुरू होते. श्रद्धाने हे नातं तोडण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, ती अपयशी ठरली. अखेर अफताबने तिची हत्या केली.

नवी दिल्ली – श्रद्धा हत्याप्रकरणातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताबच्या नार्को चाचणीला (Narco Test) परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, १ डिसेंबर रोजी त्याची नार्को चाचणी होणार आहे. याप्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आफताबने रागाच्या भरात हे कृत्य केलं असलं तरीही त्यांच्यात नियमित वाद सुरू होते. श्रद्धाने हे नातं तोडण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, ती अपयशी ठरली. अखेर अफताबने तिची हत्या केली.

हेही वाचा – श्रद्धा वालकरचे नवे चॅट्स आले समोर, रुग्णालयात दाखल झाल्याचा उल्लेख

- Advertisement -

आफताबने तिची हत्या का केली? तिच्या शरीराचे ३५ तुकडे का केले? त्यांची विल्हेवाट कशी लावली? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीत तो रोज नियमित नवनवी माहिती देत आहे. त्याची पॉलिग्राफ चाचणीही झाली. या चाचणीत त्याच्या प्रत्येक हालचालीवर आणि मानसिकस्थितीवर वैद्यकीयदृष्ट्या लक्ष ठेवण्यात आलं होतं. आता न्यायालयाने त्याच्या नार्को चाचणीलाही परवानगी दिली आहे.

आफताबच्या सुरक्षेत वाढ

आफताब ज्या पोलीस वॅनमधून जात होता, त्या गाडीवर काल हल्ला झाला होता. या हल्लेखोरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे हल्लेखोर हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला जात आहे. हल्लेखोरांनी गाडीवर चढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पोलिसांनी संपप्त जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यानंतर व्हॅन जेलच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, पोलिसांनी या हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. तसंच, आफताबच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. एफएसएल येथील रोहिणी लॅबमध्ये त्याची चाचणी करण्यात येतेय. या लॅबच्या बाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हत्येनंतर आफताबने पटवली दुसरी गर्लफ्रेंड

- Advertisement -

सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांची थर्ड बटालियन सैनिकही तैनात करण्यात आले आहेत. तर, अत्याधुनिक शस्त्रांसह पॅरामिलिट्री फोर्ससुद्धा तैनात करण्यात आले आहेत.श्रद्धाच्या हत्येनंतर काही दिवसात आफताबने डेटिंग ॲपवर एका मुलीशी मैत्री केली होती, यानंतर तिला आफबात घरी घेऊन आला होता. हत्येच्या काही दिवसातचं आफताबने दुसरी गर्लफ्रेंड पटवली होती. इतकचं नाही त्याने या नव्या गर्लफ्रेंडला गिफ्ट म्हणून एक अंगठी भेट दिली होती. जी अंगठी श्रद्धाची असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली पोलिसांनी ती अंगठी सुद्धा जप्त केली आहे.

हेही वाचा गुलामगिरीच्या काळात रचलेला इतिहास स्वातंत्र्यानंतरही शिकवला, नरेंद्र मोदींची टीका

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -