घरCORONA UPDATECovaxin ७७.८ टक्के प्रभावी, लसीच्या तिसऱ्या चाचणीनंतर भारत बायोटेकचा दावा

Covaxin ७७.८ टक्के प्रभावी, लसीच्या तिसऱ्या चाचणीनंतर भारत बायोटेकचा दावा

Subscribe

कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हायरसवर ६५.२ टक्के प्रभावी

भारत बायोटेकने आज Covaxin लसी संदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. नुकतीच कोव्हॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. कोव्हॅक्सिन लस कोरोना विरोधात ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. (Covaxin 77.8% effective, claims Bharat Biotech after third test of the vaccine)  मात्र या आकड्यांचा आढावा घेणे अद्याप बाकी आहे. भारत बायोटेकने दिलेल्या अहवालानुसार, कोव्हॅक्सिन लस कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हायरसवर ६५.२ टक्के प्रभावी असल्याचे म्हटले आहे. कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी २५ साइट्सवर १८ ते ९८ वर्ष वयोगटातील १३० कोरोना बाधितांवर करण्यात आली.

- Advertisement -

वैज्ञानिक विश्वास, क्षमता आणि आणि प्रतिबद्धतेसोबत भारताला जागतिक स्तरावर नेण्याचा अभिमान आहे. कोव्हॅक्सिन लसीला १० जागतिक स्तरावर पल्बिकेशनसाठी क्लिनिकल रिसर्च,डेटा, सुरक्षेसाठी समर्थन दिले आहे. सहकार्य करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद, असे भारत बायोटेकचे सह संस्थापक सुचित्रा एला यांनी ट्विट करत म्हटले आहे.


भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक डॉ. कृष्णा एल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील आतापर्यंतच्या लसींमध्ये कोव्हॅक्सिनची सुरक्षा आणि कार्यक्षमता ही सर्वात जास्त आहे. यामुळे भारत आणि जगातील विकसनशील देशांत नवीन कल्पना केंद्रित करण्याची क्षमता निर्माण केली आहे. जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने त्यांच्या रक्षणासाठी भारतातून नविन सुविधा उपलब्ध होतील या आम्हाला अभिमान आहे,असे  त्यांनी म्हटले.

- Advertisement -

आरोग्य संशोधन विभाग व महासंचालक आणि भारतीय वैद्यकीय संशोधक परिषदेचे प्रा. डॉ. बलराम भार्गव यांनी कोव्हॅक्सिनच्या यशस्वी चाचणीमुळे जागतिक क्षेत्रात भारतीय शिक्षण आणि उद्योगांची स्थिती आणखी बळकट केल्याचे म्हटले आहे. कोव्हॅक्सिन लसीला ब्राझील, भारत,फिलिपिन्स,इराण,मेक्लिकोसोबत १६ देशांनी आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यात दिली आहे. त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिन लसीची आपत्कालीन वापराच्या यादीत नोंद करण्यात यावी यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत चर्चा करीत आहे.


हेही वाचा – India Corona Update: देशातील बाधितांच्या संख्येत घट, २४ तासात ७३८ रुग्णांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -