घरCORONA UPDATECovaxin Booster Dose : कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोसने डेल्टा, ओमिक्रॉन होतोय निष्क्रिय, भारत...

Covaxin Booster Dose : कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोसने डेल्टा, ओमिक्रॉन होतोय निष्क्रिय, भारत बायोटेकचा दावा

Subscribe

डेल्टा व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस 100 टक्के आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर 80 टक्के प्रभावी ठरत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. याआधी डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली होती. यात मोठ्याप्रमाणात मृतांचे प्रमाण वाढले होते. मात्र यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरु करण्यात आली आहे. यानंतर रुग्णसंख्या आटोक्यात येत होती मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळु रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. यामुळे भारतात कोरोनाविरोधी लसीचा बुस्टर डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. यातच ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस प्रभावी ठरत असल्याचा दावा भारत बायोटेक कंपनीने केला आहे. डेल्टा व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस 100 टक्के आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर 80 टक्के प्रभावी ठरत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.

तसेच कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर ताप किंवा अंगदुखी, डोकेदुखीसारखी लक्षणे जाणवल्यास पॅरासिटामॉल औषधाची गोळी घेण्याची गरज नाही असं स्पष्टीकरण भारत बायोटेक कंपनीने दिले आहे. भारत बायोटेकने एक परिपत्रक काढून लस घेतल्यानंतर काय गोष्टी टाळाव्यात हे स्पष्ट केलं आहे. तसेच कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर मुलांनीही पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेणं टाळा असं आवाहन या पत्रकातून केलं आहे.

- Advertisement -


यावर स्पष्टीकरण देताना भारत बायोटेकनं म्हटलं की, क्लिनिकल ट्रायलमध्ये 30,000 लोकांवर क्लिनिकल ट्रायल करण्यात आले. यावेळी 10 ते 20 टक्के व्यक्तींना साईड इफेक्ट जाणवले आहेत. तर अनेकांना सौम्य साइड इफेक्ट्स जाणवतात. पण ही लक्षणे साधारणत: 1-2 दिवसांत नाहीसे होतात. त्यांना औषधांची गरज नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची पेन किलर किंवा गोळी डॉक्टरांच्या सल्लानुसार घ्यावी असं कंपनीने म्हटले आहे. कंपनीने पुढे म्हटले की, कोणत्याही कोरोनाविरोधी लसींसोबत पॅरासिटामॉलची शिफारस करण्यात आली असेल तरी कोवॅक्सिनसाठी औषधांची आवश्यकता नाही.


PM Modi Meeting: कोरोना स्थितीवर पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -