Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारतीय Covaxin लस कोरोनाच्या ६१७ वेरीयंट विरोधात प्रभावी - अमेरिका

भारतीय Covaxin लस कोरोनाच्या ६१७ वेरीयंट विरोधात प्रभावी – अमेरिका

Related Story

- Advertisement -

भारतीय बनावटीची covid-19 विरोधी Covaxin लस ही जीवघेण्या अशा कोरोना व्हायरसच्या जवळपास ६१७ वेरीयंट विरोधात प्रभावी असल्याचा खुलासा अमेरिकेतील टॉप पॅन्डेमिक एक्सपर्ट आणि व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ अॅंथनी फौसी यांनी व्यक्त केले आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. आम्ही याबाबतचा डेटा दररोज जमा करत आहोत. ज्या लोकांनी भारतीय बनावटीची कोवॅक्सिन घेतली आहे, अशा लोकांकडून डेटा गोळा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या डेटामधून असे आढळले आहे की जवळपास ६१७ प्रकारचे वेरीयंट न्यूट्रलाईज करण्याची क्षमता कोवॅक्सीनमध्ये आहे. त्यामुळे भारतात जे संकट दिसत आहे, त्यामध्ये सर्वात मोठा उपाय हा नागरिकांचे लसीकरण होणे हाच असणार आहे, असेही फौसी म्हणाले.

भारतीय Covaxin लस प्रभावी आणि परिणामकारक

कोवॅक्सीन ही शरीरात रोगप्रतिकारक सिस्टिमला अॅन्टीबॉडीज तयार करण्यासाठी परिणामकारक ठरते असे नुकतेच न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक वृत्त प्रकाशित झाले आहे. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला या लसीच्या प्रभावामुळे SARS-CoV-2 कोरोना विषाणू विरोधात अॅन्टीबॉडिज तयार करण्यासाठी मदत मिळते. अॅन्टीबॉडिज या वायरल प्रोटीशनशी संलग्न असतात. त्यालाच स्पाईक प्रोटीन्स असेही म्हणतात. भारत बायोटेकने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मदतीने कोवॅक्सीन विकसित केली आहे. कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी ३ जानेवारीला परवानगी मिळाली आहे. त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये कोवॅक्सीनची एफिकसी ७८ टक्के दिसून आली आहे.

अमेरिकेची स्ट्राईक टीम भारताच्या मदतीला 

- Advertisement -

भारतातील सध्याची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सेंटर फॉर डिझिज कंट्रोल एण्ड प्रिवेन्शनसाठीची आमची एक टीम भारताला मदत करत आहे. या टीमकडून भारताला आवश्यक अशलेल्या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न होत आहे. शिवाय भारतात लस निर्मितीसाठी आम्ही आणखी कच्चा माल कसा पुरवता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे भारतातल्या उद्भवलेल्या संकटासाठी आणखी मदत होऊ शकेल असे व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ सल्लागार डॉ एन्डी स्लॅविट्ट यांनी स्पष्ट केले. आम्ही भारतामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, या परिस्थितीत भारतासोबत आहोत. आम्ही अधिकाधिक स्त्रोतांची निर्मिती करतानाच पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, त्यामध्ये थेरापेटिक्स, रॅपिड टेस्टिंग किट, वेंटिलेटर्स, पीपीई किट्स आणि रॉ मटेरिअल पुरवत आहोत. तसेच लस निर्मितीसाठी कच्चा माल पुरवण्याचाही आमचा प्रयत्न आहे. त्यासोबतच सेंटर फॉर डिझिज कंट्रोलची एक स्ट्राईक टीम ही भारतात नेमण्यात आली आहे. त्यामुळे भारताला सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जी काही मदत लागेल ती मदत देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.

अमेरिकेमार्फत येत्या दिवसांमध्ये अस्ट्राझेनका उपलब्ध झाल्यानंतर इतर देशांना पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या डोसची संख्या ही ६० दशलक्ष इतकी असेल. अस्ट्राझेनका ही सर्वाधिक सुरक्षित आणि परिणामकारक लस आहे. तसेच जगभरात अनेक देशात या लसीला मान्यता मिळाली आहे. पण अद्याप अमेरिकेत या लसीला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळेच येत्या काही दिवसांसाठी तरी ही उपलब्ध नसेल, असे स्लॅविट्ट यांनी स्पष्ट केले. सध्या फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन एण्ड जॉन्सन या लसीचा पुरेसा साठा आमच्याकडे आहे. त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांसाठी सध्या पुरेसे डोस आमच्याकडे आहेत असेही त्यांनी सांगितले.


- Advertisement -

 

- Advertisement -