घरCORONA UPDATEDouble Mutant, वेरीयंट्स विरोधात Covaxin प्रभावी, ICMR चे शिक्कामोर्तब

Double Mutant, वेरीयंट्स विरोधात Covaxin प्रभावी, ICMR चे शिक्कामोर्तब

Subscribe

कोवॅक्सिन विरूद्ध कोविशिल्ड असा लस निर्मात्यांमधील वाद काही दिवसांपूर्वी भारतीयांना पाहिला होता. पण इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नव्या दाव्यामुळे कोवॅक्सिनला यापुढच्या काळात झुकत माप मिळण्याची चिन्हे आहेत. भारतासह जगभरात १० देशांमध्ये थैमान घातलेल्या इंडियन डबल म्यूटंट आणि कोरोनाच्या यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या वेरीयंट विरोधात कोवॅक्सिन प्रभावी आणि परिणाम ठरत असल्याचा दावा ICMR ने केला आहे. त्यामुळेच येत्या दिवसात कोवॅक्सिनवर नागरिकांचा अधिक विश्वास निर्माण होईल असाच काहीसा दावा या अभ्यासातून झाला आहे. आयसीएमआरच्या दाव्यामुळे स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिनला मोठा आधार मिळाला असून भारतासह जगभरातच कोवॅक्सिवर विश्वास वाढण्यासाठी त्यामुळेच मदत मिळणार आहे.

- Advertisement -

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासानुसार COVAXIN ही SARS-COV-2 च्या विविध वेरीयंट विरोधात प्रभावी ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ही कोवॅक्सिन डबल म्यूटंटविरोधातही परिणामकारक असल्याचा दावा ICMR मार्फत करण्यात आला आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक घातक अशा वेरीयंटमध्ये यूके वेरीयंट, ब्राझील वेरीयंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या वेरीयंट विरोधात कोरोनाविरोधी अशी कोवॅक्सिन परिणामकारक ठरत असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे.

ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (NIV)ने यशस्वीपणे कोरोनाचे विविध वेरीयंट कल्चर आणि आयसोलेट करून अभ्यास केला. त्यानंतरच विविध वेरीयंटविरोधात कोवॅक्सिन लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. याआधीच जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये ICMR- NIV मार्फत कोवॅक्सिन कशा पद्धतीने यूके वेरीयंट हा न्यूट्रलाईज करण्याची क्षमता कोवॅक्सिनमध्ये असल्याची क्षमता असल्याचा अभ्यास प्रकाशित केला आहे. त्यासोबतच ब्राझीलच्या वेरीयंटच्या अभ्यासाचा समावेशही त्यामध्ये आहे. आयसीएमआरने भारतात अनेक ठिकाणी आढळणारा डबल म्यूटंट स्ट्रेनबाबत आयसेलेट आणि कल्चर करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे कोवॅक्सिन डबल म्यूटंटलाही न्यूट्रलाईज करण्यात यशस्वी ठरल्याचा दावा अभ्यासातून करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -