घरCORONA UPDATECovaxin efficacy : कोरोनाच्या लक्षणांविरोधात Covaxin ७७.८ टक्के प्रभावी, Lancet चे संशोधन

Covaxin efficacy : कोरोनाच्या लक्षणांविरोधात Covaxin ७७.८ टक्के प्रभावी, Lancet चे संशोधन

Subscribe

लॅन्सेट पीआरच्या संशोधनात भारत बायोटेकटच्या कोवॅक्सिन लसीच्या परिणामकारतेवर संशोधन करण्यात आले. या संशोधनाच्या तिसऱ्या फेजच्या डेटानुसार, कोवॅक्सिन लस कोरोना लक्षणांवर ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनला मंजूर देताच आठवड्यानंतर हा अहवाल समोर आला. जगातील प्रसिद्ध आरोग्यविषयक जर्नल लॅन्सेटमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, लसीच्या ३ टप्प्यातील आकडेवारीत कोवॅक्सिन लस कोरोनाविरोधात ७७.८ टक्के इतकी परिणामकारकता दर्शवतेय. याचा प्रभावी डेटा SARS-CoV-2 च्या सर्व प्रकारांविरूद्ध ७०.०८ टक्के संरक्षण देत आहे.

कोवॅक्सिनची प्रभावीता १३० प्रकरणांच्या मूल्यमापनाद्वारे करण्यात आली, त्यापैकी २४ जण लसीकरण गटात आणि १०६ जण प्लेसबो गटातीत होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) पुणे सोबत भारत बायोटेकने भारतात सुरवातीपासून विकसित केलेली दोन डोसची ही लस कोरोनाला निष्क्रिय करण्यात यशस्वी ठरतेय.

- Advertisement -

यावर भारत बायोटेकने सांगितले की, लॅन्सेट पीअर-रिव्ह्यू परिणामकारकतेवरील संशोधनाची पुष्टी करतो की, Covaxin लस कोरोनाविरुद्ध प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. Covaxin ही एकमेव कोरोना लस आहे जी डेल्टा व्हेरियंटविरुद्ध तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमधून ६५.२ टक्के परिणामकारकता दर्शविते.

कोवॅक्सिन परिणामकारकतेवरील संशोधनात असे आढळून आले की, कोवॅक्सिन ही लस कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी आहे, तर सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर ६३.६ टक्के संरक्षण प्रदान करते. नोंदवलेल्या प्रतिकूल घटना प्लेसीबो सारख्याच होत्या, यात १२ टक्के प्रकणात फक्त काही साइड इफेक्ट्स आणि ०.५ पेक्षा कमी गंभीर घटनासमोर आल्याचे असे त्यात म्हटले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -