Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Corona Vaccine: भारताची Covaxin फुकट कोणी घेईना!

Corona Vaccine: भारताची Covaxin फुकट कोणी घेईना!

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोनाचं संकट अद्याप पूर्णतः संपलेलं नाही. मात्र कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून दिलासादायक म्हणजे सर्वत्र कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या कोरोना संकटाच्या युगात भारत कोविड -१९ ची लस अनेक देशांना विनामूल्य देत आहे. असे असूनही, इंडिया बायोटेकच्या कोविड -१९ या लसीला आंतरराष्ट्रीय खरेदीदार मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. कोरोना व्हायरस संकटाशी झगडणाऱ्या सात देशांना मदत म्हणून ‘कोव्हॅक्सिन’ चे ८.१ लाख डोस देण्याचे भारताने आश्वासन दिले होते. मात्र, आतापर्यंत केवळ म्यानमारनेच २ लाख डोसची खरेदी केल्याची माहिती आहे.

कोविड -१९ विरुद्ध भारतकडून सावधानता म्हणून म्यानमार, मंगोलिया, ओमान, बहरेन, फिलीपिन्स, मालदीव आणि मॉरिशस येथे लस पाठविल्या जाणार होत्या. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि एमओएस फार्मास्यूटिकल्स मनसुख मांडविया यांच्यात १८ जानेवारी रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी, १५ जानेवारी रोजी बायोटेक उत्पादक भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड यांना एक निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते की, कोव्हाक्सिनच्या ८.१ दशलक्ष डोस परराष्ट्र मंत्रालयाकडून खरेदी केल्या जातील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही खरेदी २२ जानेवारीनंतर सुरू होणार होती.

- Advertisement -

कोरोना लसचे ६४.७ लाख डोस इतर देशांना अनुदान म्हणून पुरविले गेले आहेत. तर व्यावसायिक आधारावर १६५ लाख डोस पुरवण्यात आले आहेत.६४.७ डोसपैकी केवळ २ लाख डोस कोवाक्सिनचे आहेत. बाकीचा डोस ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या सीरम संस्थेचा कोविशिल्डचे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी शुक्रवारी सांगितले. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना साथीच्या विरूद्ध लसीकरण कार्य झपाट्याने केले जात आहे. भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील लसीकरण करणार्‍यांची संख्या जवळपास एक कोटीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. परंतु स्वदेशी लस ‘कोव्हॅक्सीन’ खरेदी करण्यात फारच कमी देशांमध्ये रस असल्याचे दिसतेय.

एक महिना उलटून गेला तरी कोव्हॅक्सिन घेण्यास फारच कमी देश रस दर्शवित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही लस खरेदी करण्याचा निर्णय सर्व सरकारचा वैयक्तिक निर्णय आहे. सत्य ही आहे की म्यानमारने आपल्या सैनिकांना ही लस देऊन भारतावर विश्वास दाखविला आहे. परंतु सत्य हे आहे की कोवाक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी अद्याप पूर्ण झाले नाही. यामुळेच भारत बायोटेक विकसित केलेली ही लस खरेदीदारांना मिळत नाही.

- Advertisement -