Covaxin लसीचे दोन डोस symptomatic कोरोना रुग्णांवर ५० टक्के प्रभावी, संशोधन अहवाल

covaxin shows 50 percent effectiveness againt symtomatic covid 19 says Lancet study
Covaxin लसीचे दोन डोस symptomatic कोरोना रुग्णांवर ५० टक्के प्रभावी, संशोधन अहवाल

भारत बायोटेकच्या Covaxin लसीचे दोन डोस symptomatic कोरोना लक्षणं असलेल्या रुग्णांवर ५० टक्के प्रभावी ठरत असल्याचा दावा लँसेटने केला आहे. लँसेट इन्फेक्शियस डिसिज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात असा दावा करण्यात आला आहे.

लँसेटमध्ये नुकताच एक रिव्ह्यू प्रकाशित झाला होता. यात कोवॅक्सिन कोरोना लक्षणं असलेल्या रुग्णांवर ७७.८ टक्के प्रभावी ठरत आहे. तसेच याचे गंभीर दुष्परिणाम दिसत नसल्याचे म्हटले आहे. एका नव्या अभ्यासानुसार, १५ एप्रिल ते १५ मे दरम्यान दिल्लीच्या एम्स रुग्णालयात २७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांवर याबाबत संशोधन करण्यात आले. यात कोरोनाची लक्षणं असलेल्या आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ज्यावेळी हे संशोधन करण्यात आले तेव्हा भारतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने हैदोस घातला होता, यावेळी ८० टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला होता.

दरम्यान कोवॅक्सिनचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने दिले जातात. भारतात १८ वर्षावरील नागरिकांवर कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. तर काही दिवसांपूर्वी WHO ने देखील कोवॅक्सिन लसीच्या वापराला मंजुरी दिली.

लँसेटच्या संशोधनात म्हटले की, भारतीय कोवॅक्सिन लस कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांवर ७७.८ टक्के प्रभावी ठरतेय. तर गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे समोर आलेय. तर लक्षणं नसलेल्या रुग्णांवर ६३.६ टक्के परिणामकारक ठरतेय, याशिवाय डेल्टा व्हेरियंटवर ६५.२ टक्के प्रभावी ठरतेय.