गायीच्या वारसाचे Serum वापरुन तयार केली जाते Covaxin लस? काँग्रेसच्या प्रश्नावर कंपनीने दिले स्पष्टीकरण

लस निर्मिती करताना व्हिरो सेल (Vero cells) तयार करण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी गायीच्या वासराच्या सीरमचा वापर

covaxin shows 50 percent effectiveness againt symtomatic covid 19 says Lancet study
Covaxin लसीचे दोन डोस symptomatic कोरोना रुग्णांवर ५० टक्के प्रभावी, संशोधन अहवाल

देशभरात कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. मात्र आजही अनेक जणांच्या मनात कोरोना लसीविषयी संभ्रम आहे. पुन्हा एकदा कोरोना लसीसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या देशात तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यातील कोव्हॅक्सिन ( Covaxin) लस ज्या लसीला सर्वात जास्त मागणी आहे. ती लस गायीच्या वासराच्या सीरमपासून ( रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर द्रव स्वरुपात उरलेला अंश) तयार केली जाते असा दावा केला. सोबत आरटीआयचा पुरावा देत काँग्रेसचे नेते गौरव पांधी यांनी केंद्र सरकार आणि लसीच्या कंपनीने याची माहिती आधी का दिली नाही असा प्रश्नही विचारला. काँग्रेसच्या नेत्याच्या एका पोस्ट नंतर कोव्हॅक्सिन लसीविषयी प्रचंड चर्चा करण्यात आली. यावर आता कोव्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. (Covaxin Vaccine Prepared Using newborn cow calf serum,Bharat biotech gave an explanation)

कोव्हॅक्सिन लस तयार करण्यासाठी गायीच्या वासराच्या सीरमचा वापर झाल्याचे स्पष्टीकरण भारत बायोटेकने दिले आहे. लस निर्मिती करताना व्हिरो सेल (Vero cells) तयार करण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी गायीच्या वासराच्या सीरमचा वापर करण्यात आला आहे. अशाच व्हिरो सेल्सचा उपयोग याआधी पोलिओ,इन्फूएंझा सारख्या लसी तयार करण्यासाठीही करण्यात आल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.

व्हिरो सेलचा वापर कसा केला जातो?

वासराचे सीरम घेतल्यानंतर त्याची वाढ झाल्यावर ते स्वच्छ केले जातात. त्यातील अशुद्धता संपूर्णपणे काढून टाकली जाते. कोरोना व्हायरसची वाढ आणि शेवटच्या फॉर्म्युलासाठी याचा वापर झालेला नाही. संपूर्णपणे शुद्धकरण केल्यानंतर हा निष्क्रिय व्हायरस लसीसाठी वापरण्यात येतो, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

 


‘कोव्हॅक्सिन लसी तयार करण्यासाठी गायीच्या वासराचे सीरम वापरण्यात आले आहे. २० दिवसांहून लहान गायीच्या सीरमचा यात वापर केला जातो’, यासाठी आरटीआयचा पुरावा देत काँग्रेसचे नेते गौरव पांधी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत केंद्र आणि भारत बायोटेक समोर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आता केंद्र आणि भारत बायोटेककडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: कॅलिफोर्नियात वॅक्सीन जॅकपॉट, १० विजेत्यांना मिळाले लाखोंचे बक्षीस