Sunday, May 2, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Covaxin vs Covishield : कोव्हिशील्डपेक्षा कोवॅक्सिन लस वेगळी का आहे? जाणून घेऊ...

Covaxin vs Covishield : कोव्हिशील्डपेक्षा कोवॅक्सिन लस वेगळी का आहे? जाणून घेऊ साइड इफेक्ट्स आणि वैशिष्ट्ये

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला जात आहे. यात आता १८ वर्षावरील नागरिकांनाही १ मेपासून कोरोनाविरोधी लस देण्यास सुरुवात झाली आहे. देशात सध्या नागरिकांना  कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड लस दिली जात आहे. परंतु देशात अद्यापही लसीनंतरच्या दुष्परिणामांच्या धास्तीमुळे नागरिक लस घेण्यास घाबरत आहेत. तर काही नागरिक कोणती लस घ्यावी याबाबत संभ्रमात आहेत. या दोन्ही लसांचे फायदे, दुष्परिणाम आणि वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

कोवॅक्सिनची निर्मिती

कोव्हॅक्सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुणेस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन एक इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे म्हणजे यात मृत कोरोना व्हायरस वापरला आहे. ही लस शरीरात गेली तर कोरोना व्हायरसला संपवू शकते पण त्याने काही धोका होत नाही.

कोव्हिशिल्डची निर्मिती

- Advertisement -

कोव्हिशिल्ड लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेंका यांनी एकत्रितपणे विकसित केली आहे. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्डच्या उत्पादनाची जबाबदारी आहे. भारतात मंजुरी मिळणारी ही पहिलीच लस ठरली. ही लस कोरोना व्हायरसच्या कमकुवत आवृत्तीपासून बनलेली आहे. या कमकुवत व्हायरसचे नाव अडेनोव्हायरस असून तो चिंपांझीमध्ये आढळतो. यामध्ये, चिंपांझीस संक्रमित करणारा विषाणू अनुवांशिकरित्या सुधारित केला गेला आहे जेणेकरून तो मानवांमध्ये पसरू शकत नाही. ही लस जेव्हा शरीरात टोचली जाते तेव्हा रोगप्रतिकारशक्तीला कोरोना व्हायरसच्या विरोधात अँटीबॉडीज बनवण्यासाठी चालना मिळते.

कोवॅक्सिनचे फायदे

लसीकरणाचा सुरुवातीलाच कोव्हॅक्सिन ही लस वादात सापडली होती. परंतु नंतर जगभरातील तज्ञांनी या लसीच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. व्हाईट हाऊसचे वैद्यकीय सल्लागार एंथोनी फाउची यांनी नुकताच पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, कोवॅक्सिन लस भारतात आढळणाऱ्या B.1.617 व्हेरियंटवरही परिणामकारक ठरत आहे.

कोव्हिशील्डचे फायदे

- Advertisement -

कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड ही लस एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत.ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाद्वारे तयार केलेली कोव्हिशील्ड ही लस इतर अनेक देशांमध्येही वापरली जात आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, ही लस कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज तयार करण्याचे काम करते. तथापि, या दोन्ही लसांच्या गुणवत्तेमुळे त्या एकमेकांपासून वेगळ्या ठरतात.

कोवॅक्सिनचा प्रभाव

कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या लसींचा प्रभावी परिणाम होत आहे. या दोन्ही लसी WHO च्या मानकांशी जुळतात. कोवॅक्सिन लसीने या वर्षाच्या फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात मोठी चाचणी पूर्ण केली. क्लिनिकल अभ्यासानुसार, भारत बायोटेकच्या या लसीचा एफिकेसी दर ७८ टक्के असून लसीमुळे जीवघेणा संसर्ग आणि मृत्यूचा धोका १०० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

कोव्हिशील्डचा प्रभाव

कोवशिल्टचा एफिकेसी दर ७० टक्के आहे, जो सुमारे एक महिन्यानंतर दुसऱ्या डोसद्वारे ९० टक्के केला जाऊ शकतो. ही लस केवळ सिम्पटोमॅटिक इन्फेक्शनपासून आराम देऊ नाही तर कोरोनापासून लवकर बरे होण्यासाठी मदत करते.

Covaxine चे दुष्परिणाम

कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लसी रिएक्टोजेनिक साइड इफेक्ट्ससह येतात. यात लस दिलेल्या जागेवर वेदना होणे, ताप, थंडी वाजून येणे, थरथरणे, चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी किंवा पोटदुखीसारख्या साधारण वेदना जाणवू लागतात. कोवॅक्सिन लसीमुळे अद्यापपर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत.

 Covishield चे दुष्परिणाम

कोव्हिशील्ड एक प्रभावी लस आहे, परंतु बर्‍याच देशांमध्ये त्याचे दुष्परिणामांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बर्‍याच नागरिकांना रक्त गोठण्याची समस्या उद्भवली आहे. तर अशी काही प्रकरणे समोर आली आहेत जिथे लोकांना न्यूरोलॉजिकल समस्यांचा सामना करावा लागला.

किती डोस घेणे आवश्यक आहे?

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दोन्ही लसींचे दोन डोस काही आठवड्यांच्या अंतराने दिले जातात. या दोन्ही लस हातावर टोचल्या जातात. तज्ञांच्या मते, कोवॅक्सिनचा दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यांनंतर दिला जातो तर कोव्हिशील्डचा दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनंतर द्यावा लागतो.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर कोणती लस अधिक प्रभावी ?

भारतात नव्या स्ट्रेनने अधिक कहर केला आहे. ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणार्‍या नव्या स्ट्रेनसह भारतात आढळलेल्या कोरोनाचा डबल आणि ट्रिपल म्यूटेंट स्ट्रेनमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या नव्या स्ट्रेनवर कोवॅक्सिन लस अधिक परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु संसर्ग कमी करण्यासाठी दोन्हीही लस परिणामाकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.


 

- Advertisement -