घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकाळजी घ्या! परदेशातून आलेल्या प्रवाशांकडून भारतात आले कोरोनाचे ११ उपप्रकार

काळजी घ्या! परदेशातून आलेल्या प्रवाशांकडून भारतात आले कोरोनाचे ११ उपप्रकार

Subscribe

 11 Omicron sub-variants | गुरुवारपर्यंत देशभरात २२०.१२ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी गेल्या २४ तासांत ६१,८२८ लसीचे डोस देण्यात आले आहेत.

 11 Omicron sub-variants | नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात कोविड १९ ओमिक्रॉनचे ११ उपप्रकार सापडले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरांवर २४ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान घेतलेल्या तपासणीतून ही बाब समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांमार्फत हे ११ उपप्रकार भारतात पोहोचले आहेत.

हेही वाचा – डिसेंबर 2022 ठरला गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण; किमान आणि सरासरी तापमानातही वाढ

- Advertisement -

२४ डिसेंबर ते ३ जानेवारी या ९ दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि बंदरांवरून एकूण १९ हजार २२७ प्रवाशांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी १२४ प्रवाशांचे नमुने पॉझिटीव्ह सापडले आहेत. वाढते कोरोना रुग्ण आणि उपप्रकारांचा प्रसार रोखण्याकरता भारत सरकारकडून कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी केली जात आहे. चीन, हाँगकाँग, जपान, साऊथ कोरिया, सिंगापूर आणि थायलंडवरून येणाऱ्या प्रवाशांचीही कोरोना चाचणी घेतली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यालायने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १८८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. बुधवारी १७५ कोरोना रुग्ण सापडले होते. सध्या देशभरात २५५४ रुग्णांवर उपचार सुरू असून ०.०१ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. आतापर्यंत ४,४१,४६,०५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये आज २०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.८० टक्के आहे.

- Advertisement -

गुरुवारपर्यंत देशभरात २२०.१२ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी गेल्या २४ तासांत ६१,८२८ लसीचे डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा – ‘या’ देशात व्हिसाशिवाय फिरा बिनधास्त; ही सवलत मिळणार

जानेवारी २०२० पासून देशात कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता. २८ सप्टेंबर २०२० पर्यंत भारतात ६० लाख कोरोनाचे रुग्ण होते. ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, नोव्हेंबर २० रोजी ९० लाख, तर, १९ डिसेंबर २०२० रोजी एक कोटी कोरोना रुग्ण झाले होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -