घरदेश-विदेशVIDEO: रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू न शकल्याने कोरोनाबाधिताला भररात्री नेलं खांद्यावरून!

VIDEO: रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू न शकल्याने कोरोनाबाधिताला भररात्री नेलं खांद्यावरून!

Subscribe

अति दुर्गम भागात जिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा ठिकाणहून कोरोनाग्रस्त रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवणे खूप मोठे जोखमीचे काम आहे. मात्र हे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्याचेच हे एक उदाहरण...

देशभरासह राज्या-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना एक दयनीय अवस्था आणि भीषण वास्तव दाखवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. असे बरेच गावं, खेडे आहेत ज्याठिकाणी आजही रस्त्यांची अवस्था बिकट असल्यानं रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी कोरोनामुळे होणाऱ्या रुग्णांचे हाल हे खूप वाईट असल्याचे चित्र या व्हिडिओमधून समोर आले आहे. सध्या देशातील कोरोना परिस्थितीबद्दल सांगायचे झाले तर दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

परंतु, देशात अनेक ठिकाणं अशी आहेत जो अति दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी रुग्णसेवा आणि रुग्णवाहिका पोहोचण्यात खूप अडचणी येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. अशीच एक घटना आसाममधून समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आरोग्य कर्मचारी भररात्री काळोखात कोरोना रुग्णाला त्याच्या खांद्यावर घेऊन जातांना दिसतोय.

- Advertisement -

दरम्यान, अति दुर्गम भागात जिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा ठिकाणहून कोरोनाग्रस्त रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवणे खूप मोठे जोखमीचे काम आहे. मात्र हे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्याचेच एक उदाहरण हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ असल्याचे म्हणता येईल.

बघा व्हिडिओ

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आसाममधील असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून आपल्या खांद्यावर कोरोना रुग्ण घेऊन जात आहेत. अति दुर्गम भागात जिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही मात्र कोरोना रूग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक असल्याने आपल्या खांद्यावरून या रुग्णाला रुग्णवाहिकेपर्यंत ५०० मीटर अंतर पार करून आणले. हे काम अ‍ॅम्ब्युलन्स सेवेमध्ये काम करणारे गौतम सेकिया याने केले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -