कोरोनाची बूस्टर व्हॅक्सिन Delta Variant पासून करते बचाव; वाचा काय म्हणतात एक्सपर्ट

vaccination
लसीकरण

देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवता आलेले नाही. यासह डेल्टा प्लस व्हेरिएंटने जगभर धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना देण्यात आलेली कोरोना लस डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यास सक्षम आहे की नाही असा प्रश्न उपस्थित आहे. डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाचा तिसरा डोस बूस्टर डोस किती प्रभावी आहे? डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी बूस्टर लस प्रभावी ठरेल का? तर अमेरिकेत लसीकरण होत असल्याने लोकांना डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध लढण्यास प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. त्यामुळे त्यांना या व्हेरिएंटपासून संरक्षण मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन आणि अन्न व औषध प्रशासन यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले की, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अमेरिकन लोकांना डेल्टा व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. यासह त्यांना कोणत्याही बूस्टर शॉट्स किंवा लसींची आवश्यकता नाही. मात्र सध्या तरी बूस्टर लसीची गरज भासणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा फायझर-बायोटेनटेक त्याच्या लसीच्या बूस्टर शॉटसाठी परवानगी घेण्याची तयारी करत होते, त्यावेळी अमेरिकेच्या दोन्ही सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी हे वक्तव्य केले. कोविड -१९ लस तयार करणार्‍या इतर औषधी कंपन्या देखील बूस्टर शॉट्सची गरज अभ्यासत आहेत, जेणेकरून आवश्यकतेनुसार ते पूर्ण केले जाऊ शकेल.

सध्या अमेरिकेत फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लस दिली जात आहे. या सर्व लस कोरोनाव्हायरस विरूद्ध प्रभावी आहेत. इतकेच नव्हे तर या तीन लस देखील डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध खूप प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान रॉयटर्सच्या मते, दुसरीकडे, युरोपियन मेडिसीन एजन्सीने असे म्हटले की, कोविड -१९ लसीच्या दोन डोसांनंतर तिसरा बूस्टर डोस आवश्यक असेल किंवा नाही. याबद्दल आताच काही बोलणे फार हे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. डेल्टा व्हेरिएंटला बी .१.६.१७.२ म्हणून ओळखले जाते, याची नोंद गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात झाली होती. मे २०२१ मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने चिंताग्रस्त प्रकारांच्या यादीत नोंद करण्यात आली होता. डेल्टा व्हेरिएंट त्याच्या पूर्वज अल्फा व्हेरिएंट पेक्षा ६० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. अल्फा व्हेरिएंटमुळे यापूर्वी अमेरिकेत बर्‍याच कहर केला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेने जगाला अधिक चिंतेत टाकलं होतं.


US Fire: अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये भीषण अग्नितांडव; तीन लाख एकर जमीन आगीच्या विळख्यात