Covid cases in Delhi: दिल्लीत तिसऱ्या लाटेचा कहर ; २४ तासांत २१ हजार २५९ नवे रूग्ण , २३ रूग्णांचा मृत्यू

contacts of covid 19 patients dont need to be tested unless identified as high Risk government

संपूर्ण जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातला असून देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत कोरोनासह ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील २४ तासांत दिल्लीत २१ हजार २५९ इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात वाढलेला आकडा आणि मृत्यूची नोंद ही १६ जून २०२१ च्या अहवालापेक्षा सर्वाधिक आहे.

दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट २५.६५ टक्के इतका आहे. तर ५ मे २०२१ पेक्षा हा दर सर्वाधिक समजला जात आहे. राजधानीत कोरोनामु्ळे काल (सोमवार) १७ रूग्णांचा मृत्यू झालाय. तर मागील सात दिवसांमध्ये ८७ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी महाराष्ट्रात ४ जानेवारी रोजी २० पेक्षा अधिक रूग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु दिल्लीतील मृत्यूचा एकूण आकडा पाहीला असता २५ हजार २०० पर्यंत पोहोचला आहे.

दिल्लीत आतापर्यंत ५० हजार ७९६ इतके रूग्ण विलिगीकरण कक्षात आहेत. सक्रिय रूग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ४.७० इतका आहे. तर रिकव्हरी रेट ९३.७० टक्के इतका आहे. तसेच २४ तासांत १२ हजार १६१ इतक्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १४ लाख ९० हजार ७४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा मृत्यू दर १.५८ टक्के इतका आहे.

दरम्यान, देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तज्ज्ञांनी तिसरी लाट आल्याचे घोषित केले आहे. यामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण अधिक आढळत आहेत. दरम्यान, राज्यात सध्या १ लाख ७३ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये ८५ टक्के लोकांना लक्षणं नाहीयेत. तर १३ टक्के लोकांना सौम्य लक्षणे असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.


हेही वाचा : शंभर टक्के गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार, संजय राऊतांचा विश्वास