केंद्राकडून सिरमच्या UK खेपेला ब्रेक, ५० लाख डोस मोदी सरकारने रोखले

covid-19 cental government rejects sii plea to export 50 lakh doses of covishield to uk

भारतात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय यात कोरोनाचा नव्या व्हेरियंटने अनेक देशांसमोर नवे संकट उभे केले आहे. जगभरातील बहुतांश देशात कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवत आहेत. यात भारतातही लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता सीरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडियाच्या कोव्हिशील्ड लसीला अमेरिकेत निर्यात करण्यास बंदी घातली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसंच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची विनंती फेटाळून लावली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकाराने आता ५० लाख लसींचे डोस अमेरिकेत निर्यात करण्यास परवानगी नाकारली आहे.

सीरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडियाने लसीकरण मोहिमेअंतर्गत अमेरिकेशी केलेल्या कराराप्रमाणे ५० लाख लसीचे डोस यूकेला निर्यात करण्याची विनंती केंद्राकडे केली होती मात्र ही विनंती फेटाळून लावली आहे.देशातील नागरिकांना प्रथम लसींचा पुरवठा करण्याचा हेतूने स्थानिक पातळीवर कमी पडणारा लसींचा पुरवठा वाढवणयासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अनेक राज्यांना आता पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूडशी बोलणी करत लसीचे डोस खरेदी करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. शात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून मागणी होत आहे. यामुळे देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लसी दिली जाऊ शकते. देशात सध्या कोव्हिशील्ड लसीचे ५० लाख डोस नागरिकांसाठी उपलब्ध असून ते १८ ते ४४ वयोगटातील लोकांना देण्यासाठी राज्यांना खरेदी करण्यास सांगितले आहे. खासगी रुग्णालयांनाही हे डोस मिळू शकणार आहेत. अशीही माहिती समोर येत आहे.

त्यामुळे केंद्रीय मंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडियाशी संपर्क साधत राज्यांनी लवकरात लवकर लस खरेदी प्रक्रिया सुरु करावी असे आदेश केंद्राने दिले आहेत. परंतु या लसींच्या कुप्यांवर असणारे लेबल बदलावे, कारण यूकेला पुरवठा करण्यासाठी या लसींचा कुप्यांवर युके असे लेबल लावण्यात आले आहे. परंतु या लसी आता स्थानिक आरोग्य यंत्रणांना पाठवल्या जाणार असल्याने लेबल बदलने गरजेचे आहे.


covid-19 : शरीरात कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाचा खास टीप्स