Third wave : पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध ठेवा, केंद्र सरकारचे राज्यांना पत्र

देशात कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा मोठी वाढ पाहयला मिळतेय. यातच आज देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या जवळपास पोहचला आहे.

covid 19 center writes to states over medical oxygen amid corona surge in india
Third wave : पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध ठेवा, केंद्र सरकारचे राज्यांना पत्र

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनबाबत सूचना दिल्या आहेत. बुधवारी केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र लिहून सांगितले आहे की, सर्व राज्य सरकारांनी वैद्यकीय ऑक्सिजन वेळेवर देण्यासाठी सर्व तयारी करावी. तसेच रुग्णालयांमध्ये किमान 48 तासांचा बफर स्टॉक तयार ठेवावा अशा सूचनाही केंद्र सरकारने केल्या आहेत.

केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या सूचना नेमक्या काय?

१) रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक असावा.

२) रुग्णांना सेवा पुरविणाऱ्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात

३) ऑक्सिजन थेरपीमध्ये कमीतकमी 48 तास पुरेसा वैद्यकीय ऑक्सिजनचा बफर स्टॉक.

३) लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) ची उपलब्धता असावी.

४) आरोग्य सुविधा केंद्रातील LMO टँक पुरेशा प्रमाणात भरलेले असावेत आणि त्याचा पुरवठा अखंड सुरु असावा.

५) PSA प्लांट पूर्णपणे कार्यरत आहेत हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. तसेच त्यांच्या योग्य देखभालीसाठी सर्व पावले उचलली पाहिजेत.

६) ऑक्सिजन सिलिंडर तसेच बॅकअप स्टॉक आणि मजबूत रिफिलिंगची पुरेशी माहिती असावी.

७) ऑक्सिजनचे सिलिंडर भरून तयार ठेवलेले आहेत याचीही खात्री करावी.

८) लाईफ सपोर्ट उपकरणांची उपलब्धता असावी.

९) ऑक्सिजन नियंत्रण कक्षा पुन्हा कार्यान्वित कराव्यात.

देशात कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा मोठी वाढ पाहायला मिळतेय. यातच आज देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या जवळपास पोहचला आहे. गेल्या 24 तासात देशात 1,94,720 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढण्याबरोबरचं मृतांचा आकडाही वाढला आहे. मंगळवारच्या तुलनेत ही रुग्णवाढ 15.9 टक्के जास्त आहे. यामुळे देशातील कोरोनाचा संसर्ग दर 11.05 टक्क्यांवर पोहचलाय. तर देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 4868 वर पोहचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये आहे.


Omicron : ओमिक्रॉनचा नवा भाऊ सापडला, 80 टक्के प्रकरणात BA.2 स्ट्रेनचा संसर्ग