Covid Vaccination : परदेश वारी करणाऱ्यांसाठी Booster Dose बाबत BMC ची नियमावली, वाचा

Covid-19: Centre decreases gap between second and third doses to 90 days for international travellers says BMC
Covid Vaccination : परदेश वारी करणाऱ्यांसाठी Booster Dose बाबत BMC ची नियमावली वाचा

भारतात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी नागरिकांचे लसीकरण अद्यापही सुरु आहे. दरम्यान मुंबईहून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना आता दोन डोसनंतर 90 दिवसांनी बूस्टर डोस देण्याचा आदेश देण्यात आला. दरम्यान BMC ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्राने या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे BMC त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांना याबाबत आदेश जारी केले आहेत. केंद्राने शुक्रवारी जारी केले की, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त परदेशात जाणारे नागरिक कोरोनाविरोधी लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांनी बूस्टर डोस घेऊ शकतात.

दरम्यान केंद्राने कोरोनाविरोधी लसीच्या बूस्टर डोस संदर्भातील नियम शिथिल केले. यात परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बूस्टर डोसचा घेण्याचा नऊ महिन्यांचा कालावधी तीन महिन्यापर्यंत आणला. मात्र परदेशात प्रवास न करणाऱ्या प्रौढ व्यक्तींना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी बूस्टर डोस देता येईल. गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांसाठी परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दोन डोसनंतरच्या बूस्टर डोसमधील कालावधी कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तज्ज्ञांनी अभ्यास करत कालावधी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला.

या निर्णयानुसार, ज्या व्यक्तिंना आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे, त्या व्यक्तींना संबंधित देशातील नियमांनुसार, बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे, अशा व्यक्तिंना आता दुसरा डोस घेतल्यानंतर किमान 90 दिवसांनी तिसरा डोस घेता येणार आहे, अशी माहिती एका विशेष पत्राद्वारे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान देशात आता सरकारी कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि वय वर्ष 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना सदर सुविधा शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर बूस्टर डोस देण्यात येत आहे. तसेच 18 वर्ष ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोसची सुविधा उपलब्ध आहे.


गोरखपूर- वांद्रे हमसफर एक्स्प्रेसमध्ये बॉम्बच्या ट्विटमुळे खळबळ