घरCORONA UPDATEमिठाईमुळे कोरोना होत नसल्याचा दावा करणाऱ्या दुकानाचा परवाना जप्त

मिठाईमुळे कोरोना होत नसल्याचा दावा करणाऱ्या दुकानाचा परवाना जप्त

Subscribe

मिठाईमुळे कोरोना होत नसल्याचा दावा एका मिठाईच्या दुकानदाराच्या चांगलाच अंगलट आला आहे. तामिळनाडूच्या कोईंबतूर जिल्ह्यातील चिन्नियामपलायम येथील एका मिठाईच्या दुकानदाराने दावा केला होता की, त्याच्या दुकानातील म्हैसूरपा मिठाई खाल्ल्यामुळे कोरोना बरा होतो. यानंतर अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने (fssai) दुकानदार श्रीराम याच्यावर कलम ५३ अंतर्गत दिशाभूल करणारी जाहीरात केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. प्राधिकारणाचे अधिकारी के. तमिल सेल्वन यांनी सांगितले की, दुकानदाराच्या विरोधात चौकशी लावली आहे.

तमिल सेल्वन यांनी सांगितले की, मिठाईचा दुकानदार कोरोना बरा होत असल्याचा दावा करत होता. मात्र त्याला मिठाईमध्ये असे कोणते तत्त्व आहेत ज्यामुळे कोरोना बरा होतो, असे विचारल्यानंतर दुकानदाराला त्याचे उत्तर देता आले नाही. त्यानंतर fssai ने दुकानाचा परवाना रद्द केला. तसेच दुकानातली १२० किलो म्हैसुरपा मिठाई जप्त केली. जप्त केलेल्या मिठाईची किमंत जवळपास एक लाख रुपयाच्या आसपास होती.

- Advertisement -

तसेच श्रीरामचे म्हणणे होते की, या मिठाईतील हर्बल तत्त्वामुळे मिठाई खाल्ल्यानंतर आपली इम्युनिटी चांगली होते. तीन दिवस म्हैसरपा मिठाईचे चार तुकडे खाल्ल्यास कोरोनापासून मुक्ती मिळते. खोट्या दाव्यासोबतच हा दुकानदार ५० ग्रॅम मिठाई ५० रुपयाला विकत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -