घरताज्या घडामोडीcorona update : २०२१ मध्ये पहिल्यांदाच कोरोना मृतांचा आकडा ३०० पार

corona update : २०२१ मध्ये पहिल्यांदाच कोरोना मृतांचा आकडा ३०० पार

Subscribe

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामध्येच आता २०२१ या वर्षामध्ये पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा ३०० पार झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये म्हणजे शनिवारी झालेल्या मृत्यूचा आकडा हा ३१२ इतका होता. याआधी गेल्यावर्षी २४ डिसेंबरला मृत्यूची संख्या ३०० पार होती. देशभरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या गेल्या २४ तासांमध्ये ६२ हजार ५०० इतकी पोहचली. गेल्या १६३ दिवसांमध्ये कोरोना रूग्णांमध्ये ही झालेली रेकॉर्ड ब्रेकिंग अशी वाढ आहे. देशभरात सध्या देशात अॅक्टीव्ह कोरोना रूग्णांच्या केसेसची संख्या ही ४.८५ लाख इतकी आहे. आज रविवारी ही संख्या ५ लाखांचा आकडा पार होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांमध्येच देशात कोरोना रूग्णांच्या संख्येने १ लाख आकडा पार केला आहे.

भारतात शुक्रवारी कोरोना रूग्णांची संख्या ही ६२ हजार ६०८ इतकी होती. १५ ऑक्टोबरपासूनची ही सर्वाधिक अशी आकडेवारी होती. महाराष्ट्र, पंजाब पाठोपाठच आता छत्तीसगढ हे तिसरे राज्य आहे जिथे कोरोना रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. या तीन राज्यांमध्ये मार्चपासून एकत्रित असा आकडा तीन लाखांवर गेला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत दुप्पट अशी वाढ पहायला मिळाली आहे. १७ मार्चरोजी कोरोना रूग्णांची संख्या २७ हजार ४ इतकी होती. दहा दिवसांमध्ये हीच संख्या ५३ हजार १९८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये एकुण ३१२ मृत्यूची नोंद झाली आहे. त्याआधी शनिवारी १६६ मृत्यूची नोंद झाली होती. महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी ३५ हजारांहून अधिक होता. त्याआधी शुक्रवारी महाराष्ट्रात ३६ हजार ९०२ रूग्णांची नोंद झाली होती. एकट्या मार्च महिन्यातच महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा पाच लाखांवर पोहचला आहे. तर मुंबईत ६१३० रूग्णांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगढ येथेही कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. याठिकाणी ३६१२ नव्या कोरोना रूग्णांची नोंद शनिवारी झाली. २८ सप्टेंबरपासूनची ही सर्वाधिक अशी वाढ आहे. तर गुजरातमध्येही सतत सहाव्या दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे. गुजरातमध्ये शनिवारी २२७६ रूग्णांची भर पडली. गुजरातमध्ये गेल्या दहा दिवसात देशातील कोरोना रूग्णसंख्येच्या एक तृतीयांश रूग्णांची भर पडलेली आहे. तर कर्नाटकात २८८६ रूग्णांची भर पडली. तामिळनाडूतही २ हजार रूग्णांची भर पडलेली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -