Corona: ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा ८० हजार पार!

Corona: ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा ८० हजार पार!

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ब्राझीलमधील कोरोना बळींची संख्या देखील वाढली आहे. ब्राझीलमधल्या कोरोना बळींच्या संख्येने ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ब्राझील व्यतिरिक्त सर्वाधिक कोरोनाचे बळी अमेरिका, ब्रिटन, इटली, मॅक्सिको, आणि फ्रान्स देशात झाले आहेत. त्यामुळे जगातील कोरोना मृतांची संख्या ६ लाख १३ हजार पार झाली आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ब्राझीलमध्ये २१ लाख २१ हजार ६४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ८० हजार २५१ जणांचा मृत्यू झाला असून एकूण १४ लाख ९ हजार २०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ३२ हजार १९२ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर भारत, रशिया आणि साउथ आफ्रिक देश आहेत. जगातल सर्वाधिक कोरोनाबाधित देश अमेरिका, ब्राझील, भारत आहे. या देशांमध्ये १० लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या ३९ लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत अमेरिकेत १ लाख ४३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाखांहून अधिक असून आतापर्यंत २८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ४८ लाख ५१ हजारांहून अधिक आहे.


हेही वाचा – आता सरकार करणार न्यायमूर्ती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चष्म्याचा खर्च!