घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोना व्हायरसमुळे लाखो मुलांचे जीव धोक्यात- युनिसेफ

कोरोना व्हायरसमुळे लाखो मुलांचे जीव धोक्यात- युनिसेफ

Subscribe

जगात आलेल्या कोरोना व्हायरसच्या या भयंकर विषाणूचा परिणाम जगभरातील लाखो लहान मुलांवर होणार आहे. कारण या आजारामुळे गोवर, पोलिओ सारख्या डोसापासून लाखो मुलं वंचित राहण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र बाल निधी ने सांगितल्यानुसार, कोरोना महामारी येण्याआधी गोवर, पोलिओ आणि महत्त्वाच्या लसी देण्याचं काम अगदी नित्यनियमानं सुरू होतं. युनीसेफने सध्याची परिस्थीती बघता इशारा दिला आहे की, २०२० आणि या पुढे या पेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यांनी शनिवारी सांगितले की, २०१८ मध्ये १३ कोटी बालक लसीपासून वंचित राहीले होते.

जागतिक लसीकरण सप्ताह २०२० च्या सुरूवातीलाच युनीसेफने सांगितले की, कोरोनाचा प्रसार थांबवण्यात लसीकरण सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लाखो मुलांना गोवर, पोलिओ या सारख्या जीवनारक्षक लसींपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

युनिसेफचे प्रधान सल्लागार आणि लसीकरण प्रमुख रॉबिन नंदी म्हणाले, “लसीकरण झालेल्या मुलांसाठी आमचे जीवनरक्षक काम आवश्यक आहे.” युनिसेफचा अंदाज आहे की सन २०१० ते २०१८ दरम्यान १८.२ दशलक्ष मुले गोवरच्या पहिल्या डोसापासून वंचित राहतील.


हे ही वाचा – सौदी अरेबियात मरण पावलेल्या भारतीयांच्या अंत्यसंस्कारासाठी माणसं नाहीत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -