घरताज्या घडामोडीOmicron Variant: देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची वेगाने वाढ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या अधिकाऱ्यांसोबत...

Omicron Variant: देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची वेगाने वाढ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

Subscribe

देशभरात ओमिक्रॉनबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील १५ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या २१३वर पोहोचली असून ९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सर्वाधिक ओमिक्रॉनबाधितांचे रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आढळले आहेत. तसेच देशातील कोरोनाबाधितांची संख्या देखील १८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आता देशातील ओमिक्रॉन आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अधिकाऱ्यांसोबत उद्या बैठक होणार आहे.

- Advertisement -

देशातील आज ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या २०० पार गेली आहे. देशातील २१३ ओमिक्रॉनबाधित आढळले असून त्यातील ९० रुग्ण बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच देशात आज ६ हजार ३१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात ७८ हजार १९० सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

- Advertisement -

कोणत्या राज्यात किती ओमिक्रॉनबाधित आढळले?

दिल्ली – ५७ रुग्ण – १७ रुग्ण डिस्चार्ज
महाराष्ट्र – ५४ रुग्ण – २८ रुग्ण डिस्चार्ज
तेलंगणा – २४ रुग्ण
कर्नाटक – १९ रुग्ण – १५ रुग्ण डिस्चार्ज
राजस्थान – १८ रुग्ण – १८ रुग्ण डिस्चार्ज
केरळ – १५ रुग्ण
गुजरात – १४ रुग्ण – ४ रुग्ण डिस्चार्ज
जम्मू आणि काश्मीर – ३ रुग्ण – ३ रुग्ण डिस्चार्ज
ओडिसा – २ रुग्ण
उत्तर प्रदेश – २ रुग्ण – २ रुग्ण डिस्चार्ज
आंध्र प्रदेश – १ रुग्ण – १ रुग्ण डिस्चार्ज
चंदीगढ – १ रुग्ण
लडाख – १ रुग्ण – १ रुग्ण डिस्चार्ज
तामिळनाडू – १ रुग्ण
पश्चिम बंगाल – १ रुग्ण – १ रुग्ण डिस्चार्ज


हेही वाचा – Omicron Variant: WHOचा इशारा; ओमिक्रॉनचे युरोपात येणार वादळ!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -