घरCORONA UPDATECorona Vaccine : कोरोनातून बरे झाल्यानंतर किती महिन्यांनी घ्यावा डोस, केंद्राच्या नव्या...

Corona Vaccine : कोरोनातून बरे झाल्यानंतर किती महिन्यांनी घ्यावा डोस, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

Subscribe

लस मिळाल्यानंतर किंवा कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर शरीरात किती महिने प्रतिकारशक्ती म्हणजेच अँटीबॉडी अबाधित राहते, याबाबत लोकांना प्रश्न पडत आहे. या प्रश्नांची आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांनी उत्तरे दिली आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर किती महिन्यांनी लस घ्यावी यासंदर्भात केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी तीन महिन्यानंतर कोरोनाविरोधी लस घ्यावी अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी दिली आहे.

केंद्राने या गाईडलाईन्समध्ये लिहिले की, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तीन महिन्यांनंतर कोरोनाविरोधी लस मिळेल. यात ‘बूस्टर’ डोसचाही समावेश आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी म्हटले की, “कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना आता तीन महिन्यांनी बरे झाल्यानंतर लसीचा डोस देण्यात येईल. यामध्ये बूस्टर डोसचा देखील समावेश असेल. या आदेशाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची विनंती शील यांनी केली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंट संसर्गामुळे देशात लसीकरण मोहिम पून्हा वेगाने सुरु आहे. या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी सरकारकडून अनेक माध्यमातून जनजागृती केली जातेय. मात्र यानंतर लसीसकरणासंदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. लस मिळाल्यानंतर किंवा कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर शरीरात किती महिने प्रतिकारशक्ती म्हणजेच अँटीबॉडी अबाधित राहते, याबाबत लोकांना प्रश्न पडत आहे. या प्रश्नांची आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांनी उत्तरे दिली आहे.

- Advertisement -

बलराम भार्गव यांच्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्याच्या शरीरात सुमारे नऊ महिने अँटीबॉडी टिकून राहतात. तसेच प्रतिकारशक्तीवर भारतात एक अभ्यास झाला आणि जागतिक स्तरावरही संशोधन झाले. यातून अँटीबॉडी शरीरात सुमारे नऊ महिने टिकते.अशी माहिती समोर आली आहे.


उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -