घरताज्या घडामोडीCoronavirus: कोरोनामुळे ब्राझीलमध्ये मृतांचा ढीग; दफन करण्यास स्मशानात जागाच नाही

Coronavirus: कोरोनामुळे ब्राझीलमध्ये मृतांचा ढीग; दफन करण्यास स्मशानात जागाच नाही

Subscribe

जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ब्राझीलने कोरोनाबाधितांच्या संख्येत रशियाला मागे टाकले आहे आणि आता कोरोनाबाधितांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलमधील या परिस्थितीतमुळे साओ पाउलो शहरातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी जागा नाही आहे.

गेल्या २४ तासांत ब्राझीलमध्ये सुमारे २० हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या ३ लाख ४७ हजार ३९८वर पोहोचला आहे. तर मृतांची संख्या २१ हजारहून अधिक झाली आहे. पण ब्राझीलच्या स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी जागा नसल्याचे समोर येत आहे. या चित्रातून ब्राझीलमधील परिस्थिती किती भयावह आहे ते दिसतेय. पीपीई किट घालून कर्मचारी या ठिकाणी मृतदेहाचे दफन करीत आहेत. यामध्ये मृताचे कोणतेही नातेवाईक आजूबाजूला दिसत नाही आहेत.

- Advertisement -

एकीकडे मृतदेह एका रांगेत ठेवले आहेत तर दुसरीकडे दफन करण्यासाठी खोदण्याचे काम सुरू आहे. दररोज शेकडो मृतदेह दफन केले जात आहे. या ठिकाणी दिसत आहे की, खड्डे किती जवळ जवळ खोदले जात आहेत. तसंच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जागा नसल्यामुळे मृतदेह दफन करण्यासाठी नवीन खड्डे खोदले आहेत.

सध्या ब्राझीमधील हॉस्पिटल आणि स्मशानभूमीत मृतदेहाची ढीग आहे. जागतिक आरोग्य संघटनेन म्हटले आहे की, दक्षिण अमेरिका महामारीचा नवा केंद्रबिंदू झाला आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ब्राझीमध्ये विरोधकाचा आणि बऱ्याच मोठ्या वैज्ञानिकांचे असं म्हणणं आहे की, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या आडमुठी वृत्तीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फणस डोक्यात पडल्यामुळे रिक्षाचालकाला झाला कोरोना! जाणून घ्या नेमकी घटना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -