CoronaVirus: धक्कादायक! निकृष्ट दर्जाचे पीपीई किट भारत चीनकडून घेणार!

Over 90,000 health workers infected with COVID-19 worldwide: nurses group
प्रातिनिधिक छायाचित्र

जगभरात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणाच फैलाव होत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहेत. दरम्यानच सध्या रुग्णालयातून पीपीई किट कमतरता असल्यामुळे अनेक तक्रारी केल्या जात आहेत. म्हणून भारत चीनकडून पीपीई किट घेणार असल्याचं समोर आलं आहे. सध्या चीन वैद्यकीय उपकरणे (उदाहरणार्थ ज्यामध्ये पीपीई किट, व्हेंटिलेटर, काळे चष्मे अशा वैद्यकीय गोष्टींचा समावेश असतो) अनेक देशांना निर्यात करत आहे. मात्र चीनला निर्यात केल्या देशातून या वैद्यकीय उपकरणाबाबत अनेक तक्रारी येत आहे. ही उपकरणे निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलं जात आहे. तरीदेखील भारत सरकार याकडे कानाडोळा करून चीनकडून वैद्यकीय उपकरणांची मागणी करत आहे.

भारताने सुमारे १.५ कोटी पीपीई किटची मागणी चीनकडून केली आहे. याबाबत करार भारताने चीनशी केला असल्याचं समोर आलं आहे. तसंच नवी दिल्ली देखील चीनकडून १५ लाख टेस्टिंग किटची खरेदी करणार आहे, याबाबत चीनमधील भारतीय राजदूर विक्रम मिश्री यांनी मंगळवारी सांगितलं. यापैकी काही वस्तू यापूर्वीच भारतात पोहोचल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच चीनने १ लाख ७० हजार पीपीई किट भारताला दिले आहेत.

बीजिंगमध्ये पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत सांगितलं की, जून २०२० पर्यंत २.७ कोटी एन-९५ मास्क, १६ लाख टेस्टिंग किट आणि १.५ कोटी पीपीईची मागणी पूर्ण केली जाईल. याबाबत आतापासून कामाला सुरुवात केली आहे. सध्या चीनला युरोपियन देशांकडून कमी गुणवत्तेची उपकरणे निर्यात केल्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे आणि अशा परिस्थितीत भारताने मागणी केली आहे.

युरोपियन देशांच्या तक्रारीनंतर चीनने आरोग्य उपकरणाच्या गुणवत्ताची तपासणी केली आहे. यामध्ये मास्क, सुरक्षित पोशाख, काळे चष्मे आणि व्हेंटिलेटरचा समावेश आहे. सध्या भारत सरकार आणि जवळच्या कंपन्या वैद्यकीय उपकरणे चीनकडून खरेदी करत आहे. त्यामुळे चीनमधील भारतीय दूतावास मदत करीत आहे.


हेही वाचा – CoronaVirus: इटलीतील भारतीय विद्यार्थी एका महिन्यानंतर सुखरूप परतले घरी