घरताज्या घडामोडीCovid-19 India: कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाहीच; १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने...

Covid-19 India: कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाहीच; १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढतोय

Subscribe

देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण आणि लसीकरणाबाबतचा आढावा देण्यासाठी आज आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘गेल्या चार आठवड्यात देशातील १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना केसेस वेगाने वाढताना दिसत आहेत. देशातील ४७.५ टक्के केसेसची नोंद १८ जिल्ह्यात होत आहे. तसेच गेल्या आठवड्यामध्ये केरळच्या १० जिल्ह्यांमध्ये ४०.६ टक्के कोरोना केसेस आढळल्या आहेत. तसेच ४४ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये केरळ, मणिपूर, मिझोरमा आणि नागालँडचे जिल्हे आहेत.’

पुढे अग्रवाल म्हणाले की, ‘१००हून अधिक केसेसची नोंद झालेले २७९ जिल्हे १ जूनला होते. त्यात आता घट झाली असून ५७ जिल्हे झाले आहेत. १० मेला देशात ३७ लाख सक्रिय केसेस होत्या आता त्यामध्ये घट होऊन ४ लाख झाल्या आहेत. १ लाखांहून अधिक सक्रिय केसेस असलेले एक राज्य आहे, तर १० हजार ते १ लाख सक्रिय रुग्ण असलेले ८ राज्य आहेत. तसेच २७ राज्यांमध्ये १० हजारांहून कमी सक्रिय रुग्ण आहेत.’

- Advertisement -

देशात एकूण ४७.८५ कोटी लसीकरण झाले आहे. ज्यामध्ये ३७.२६ कोटी लोकांनी पहिला डोस आणि १०.५९ कोटी लोकांना दुसरा डोस घेतला आहे. जगभरात मोठ्या संख्येने कोरोना केसेस समोर येत आहेत. महामारी अजूनही संपली नाही आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट देखील अजूनही आहे. दिवसा ३० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. सध्या आपल्याला कोरोना दुसऱ्या लाटेवर नियंत्रण करावे लागेल, असे अग्रवाल यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १०१ पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -