Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE COVID-19 Latest Updates: दिलासादायक! देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट

COVID-19 Latest Updates: दिलासादायक! देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात देशात १ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पण आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ९६ हजार ९८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ५० हजार १४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २६ लाख ८६ हजार ४९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६५ हजार ५४७ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १७ हजार ३२ हजार २७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्या ७ लाख ८८ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८ कोटी ३१ लाख १० हजार ९२६ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे. यापैकी काल दिवसभरात ४३ लाख ९६६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

आयसीएमआरच्या माहितीनुसार, ५ एप्रिलपर्यंत २५ कोटी २ लाख ३१ हजार १६९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी काल दिवसभरात १२ लाख ११ हजार ६१२ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या.


हेही वाचा – Maharashtra Mini Lockdown: वीकेंड लॉकडाऊन परिणामकारक नाही, केंद्राचा महाराष्ट्राला सल्ला


 

- Advertisement -