घरCORONA UPDATEWHOने सांगितली कोरोना व्हायरसची उत्पत्ती!

WHOने सांगितली कोरोना व्हायरसची उत्पत्ती!

Subscribe

चीनहून उद्यास आलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरशः संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसरी लाट येत आहे. २०१९च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर चीनमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आणि संपूर्ण जगभरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आता चीनची जागा अमेरिकेने घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान कोरोनाच्या काळाच्या सुरुवातीपासून हा व्हायरस वुहानच्या लॅबमधून उद्यास आल्याचे म्हटले जात होते. पण आता खुद जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा चीनवरील आरोप फेटाळून लावत कोरोनाचा फैलाव वुहानच्या लॅबमधून नव्हे तर प्राण्यांपासूनच मानवामध्ये झाल्याचा अंदाज WHOच्या अहवालात नमूद केल्याचे समोर आले आहे. याबाबतचे वृत्त एपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

जानेवारी महिन्यात WHOचे १० अधिकाऱ्यांचे पथक कोरोनाची उत्पत्तीचे कारण शोधण्यासाठी वुहान दौऱ्यावर गेले होते. माहितीनुसार, WHOचे हे पथक सिंगापूरहून वुहानला रवाना झाले झाले होते. याच WHOच्या पथकाने अहवाल आता सादर केला आहे. कोरोना व्हायरस वटवाघळांतून प्रसारित झाला आणि इतर प्राण्यांमध्ये त्याचा प्रसार झाला. मग त्यानंतर कोरोनाची लागण मनुष्याला होऊन तो जगभरात पसरला, अशी शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. अहवालामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे काही सिनेरिया सांगितले. कोरोना व्हायरस वटवाघळांद्वारे दुसऱ्या प्राण्यांच्या माध्यमातून मनुष्यामध्ये पसरला. कोरोना हा वटवाघळांपासून मानवांमध्ये पसरण्याची शक्यता कमी आहे. शिवाय कोल्ड-चेन खाद्यपदार्थाच्या माध्यमातून देखील कोरोना पसरण्याची शक्यता कमीच आहे.

- Advertisement -

WHOचा हा अहवाल उशिचा प्रसिद्ध झाल्यामुळे चीनला वाचवण्यासाठी कोणतेही निष्कर्ष बदलण्याचा प्रयत्न केला होता का?, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. गेल्या आठवड्यात WHOच्या एका अधिकाऱ्याने पुढील काही दिवसांमध्ये अहवाल प्रसिद्ध होण्याची त्यांना आशा आहे. WHO चे सदस्य देश असलेल्या जिनेव्हातील एका अधिकाऱ्यांपासून एपी वृत्तसंस्थेला अहवालाचा ड्राफ्ट मिळाला. पण नेमका हाच अंतिम आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


हेही वाचा – India Coronavirus: दिलासादायक! देशाच्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत किचिंत घट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -