घरताज्या घडामोडीCorona : घरी परतलेल्या ११ कोटी स्थलांतरीत मजुरांना मिळाला मनरेगाचा आधार

Corona : घरी परतलेल्या ११ कोटी स्थलांतरीत मजुरांना मिळाला मनरेगाचा आधार

Subscribe

कोरोनामुळे उद्भवलेले संकट आणि राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक बड्या शहरांमधील स्थलांतरीत मजूर हे गेल्या वर्षी आपल्या मूळ गावी परतले होते. पण हातावरच पोट असणाऱ्या या स्थलांतरी मजुरांच्या मदतीला केंद्राची एक योजना आधार देणारी ठरली ती योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (MGNREGS) ही योजना. अनेक स्थलांतरीत मजुरांना लॉकडाऊनसारख्या आर्थिक संकटाच्या काळात या योजनेमुळे एक मोठा आधार मिळाला. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२०-२१ या कालावधीत जवळपास ११ कोटी लोकांना या योजनेमुळे रोजगार मिळाला. योजनेला सुरूवात झाल्यापासूनच आतापर्यंत झालेली ही सर्वाधिक मोठी अशी कामगिरी आहे. योजनेच्या २००६-०७ या कालावधीत ११ कोटी लोकांना रोजगार मिळण्याची ही पहिलीच अशी वेळ आहे.

यंदाच्या वर्षी कोरोनामुळे अनेक स्थलांतरीत मजूर हे आपल्या मूळ गावी परतले होते. त्यामुळेच २०२०-२१ मध्ये ११.१७ कोटी लोकांनी या योजनेसाठी काम केले. त्याआधी २०१९-२० मध्ये ७.८८ कोटी लोकांनी योजेअंतर्गत काम केले होते. गेल्या आर्थिक वर्षामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत ४१.७५ टक्के अधिक लोकांनी योजनेअंतर्गत सहभाग घेतला. आतापर्यंत मनरेगा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्यांमध्ये २०१३-१४ ते २०१९-२० या कालावधीत सरासरी ६.२१ कोटी ते ७.८८ कोटी इतक्या लोकांनी योजनेत सहभाग घेतला. त्यामुळे कोरोनामुळे एकीकडे लोकांचे रोजगार गेले असे चित्र असले तरीही दुसरीकडे मात्र ३ कोटी अधिक लोक मनरेगामध्ये सहभागी होऊ शकले हेदेखील आकडेवारीतून समोर आले आहे.

- Advertisement -

मनरेगा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटूंबातील सदस्यांना अकुशल अशा स्वरूपाचे काम करण्यासाठी १०० दिवसांचा किमान रोजगार एका आर्थिक वर्षात मिळतो, अशी ही योजना आहे. ही योजना २००६-०७ मध्ये ही योजना २०० सर्वाधिक अशा मागास जिल्ह्यात राबविण्यात आली होती. त्यानंतर २००७-०८ मध्ये ही योजना १३० आणखी जिल्ह्यांमध्ये विस्तारीत करण्यात आली. संपुर्ण देशात योजनेची अंमलबजावणी ही २००८-०९ मध्ये करण्यात आली होती. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत 100 दिवसांचा रोजगार मिळणाऱ्यांची संख्या ही ६८.५८ लाख इतकी होती. जवळपास ६८.९१ टक्के इतकी वाढ होत झालेली दिसली आहे. त्यामध्ये ४०.६० लाख अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालावधीत मनरेगा योजनेवर होणाऱ्या खर्चानेही नवा उच्चांक गाठला. २०२०-२१ साली संपुर्ण वर्षभरात ११०,८०२ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. तसेच हा खर्च ६२.३१ टक्के इतका अधिक होता. २०१९-२० च्या तुलनेत हा खर्च अधिक होता. २०१९-२० मध्ये ६८ हजार २६५ कोटी रूपये इतका खर्च झाला होता.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -