घरCORONA UPDATECovid-19 : छत्तीसगडमधील जंगलात ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण, तर १०...

Covid-19 : छत्तीसगडमधील जंगलात ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण, तर १० जणांचा मृत्यू

Subscribe

देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. यात छत्तीसगडमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय तर बरेच कोरोना संक्रमित रुग्णांचा उपचारांअभावी मृत्यू होत आहे. दरम्यान, छत्तीसगडच्या दंडकारण्य जंगलात कोरोना विषाणूमुळे १० नक्षलवाद्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर काल म्हणजेच सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या परिस्थितीमुळे नक्षलवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल आहे. दंतेवाडा एसपी अभिषेक पल्लव यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. दरम्यान २० दिवसांपूर्वी सुकमा आणि विजापूर जंगल परिसरातील नक्षलवाद्यांची मोठी सभा झाली. या सभेला 500 हून अधिक माओवादी उपस्थित होते. या माओवाद्यांमुळे येथे कोरोना संसर्ग पसरल्याचे बोलले जात आहे. या भागात 2 लाखाहून अधिक आदिवासी राहतात त्यामुळे या जंगलातील माओवाद्यांमुळे या आदिवासी बांधवांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. परंतु असे असतानाही येथील अनेक खेड्यांमध्ये माओवाद्यांच्या छोट्या-छोट्या बैठका सुरूच आहेत.

- Advertisement -

छत्तीसगडमध्ये ७२ लाख २७ हजार ४९७ रुग्ण झाले कोरोनामुक्त

छत्तीसगडमधील कोरोना स्थिती अतिशय भयंकर रुप धारण करत आहे. यात सोमवारी ११ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत छत्तीसगडमध्ये ११ हजार ८६७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान १७२ जणांचा कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू झाला आहे. यासह छत्तीसगडमध्ये सक्रिय रूग्णांची संख्या १२ लाख ५ हजार १०४ वर पोहचली आहे. तर कोरोना मृतांची संख्या १० हजार ७४२ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही ८६ लाख ३ हजार ३४३ वर पोहचली आहे. आतापर्यंत छत्तीसगडमध्ये ७२ लाख २७ हजार ४९७ रुग्ण झाले कोरोनामुक्त झाले आहेत.


केंद्राकडून सिरमच्या UK खेपेला ब्रेक, ५० लाख डोस मोदी सरकारने रोखले


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -