घरताज्या घडामोडीधक्कादायक! कोरोनामुळे फुफ्फुसावर आघात होतानाच, रक्ताच्याही होताहेत गुठळ्या

धक्कादायक! कोरोनामुळे फुफ्फुसावर आघात होतानाच, रक्ताच्याही होताहेत गुठळ्या

Subscribe

कोरोनामुळे फक्त फुफ्फुसालाच धोका नाही तर शरीरातही रक्ताच्या गुठळ्याही होऊ शकतात", असा धक्कादायक दावा तज्ज्ञांनी केला आहे

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. दररोज देशात लाखोंच्या संख्येने नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. एकीकडे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा ताण येऊ लागला आहे. यामुळे ऑक्सिजन, बेड्स याची देखील कमतरता जाणवू लागली आहे. त्यातच तज्ज्ञांकडून दररोज नवनवे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आता असा दावा करण्यात आला आहे की, “कोरोनामुळे फक्त फुफ्फुसालाच धोका नाही तर शरीरातही रक्ताच्या गुठळ्याही होऊ शकतात”, असा धक्कादायक दावा तज्ज्ञांनी केला आहे.

आता शरीरात होतात रक्ताच्या गुठळ्या

आतापर्यंत कोरोनामुळे रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम होतो आणि त्यामुळे रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी होते, असे सांगण्यात येत होते. कोरोनाचा विषाणू फुफ्फुसावर आघात करतो आणि त्यामुळे संपूर्ण फुफ्फुस खराब होते, असे बोले जायचे. परंतु, आता एका अभ्यासातून केवळ फुफ्फुसच नाही तर शरीरात देखील रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे समोर आले आहे. या स्थितीस डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजेच डीव्हीटी, असे बोले जाते.

- Advertisement -

सध्या कोरोना रुग्णांमध्ये डीव्हीटीची १४ ते २८ इतकी टक्केवारी आहे. तसेच धमनी थ्रोम्बोसिसची टक्केवारी २ ते ५ टक्के आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, “हा संसर्ग फुफ्फुसांसह रक्त पेशींशीही संबंधित आहे”.

“आम्ही दर आठवड्याला सरासरी पाच ते सहा प्रकरणे पाहत आहोत. या आठवड्यात दररोज असा प्रकार समोर येत आहे. तसेच रुग्णाच्या धमनीत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे फोटो पोस्टही करण्यात आले होते”.  – डॉ. अंबरीश सात्विक, सर गंगा राम रुग्णालय, वेसल अँड इनहेलेशन सर्जन; दिल्ली

- Advertisement -

“ज्या रुग्णांना टाईप-टू डायबिटीज मेलीटस आहे, अशा कोरोना रुग्णांमध्ये रक्त जमा होण्याचे प्रकरण समोर येत आहे. परंतु, नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही”.  – डॉ. अमरीश कुमार, दक्षिण-पश्चिमद्वारका, आकाश हेल्थ केअरम; हृदय विभाग

डीप व्हे थ्रोम्बोसिस म्हणजे नेमके काय?

रुग्णाच्या शरीराच्या आतील भागातील रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी निर्माण होते. तेव्हा डीव्हीटी फार गंभीर होते. त्यावेळी धमन्यांमध्ये रक्ताची गाठ देखील होते. विशेष म्हणजे शरीरातील रक्तवाहिन्या या हृदयापर्यंत रक्त पोहोचवतात. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानतंर त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्याशिवाय स्ट्रोक आणि अवयव निकामी होऊ शकतात. हा धोका साधारण श्वसनाचा त्रास असलेल्या कोरोनाग्रस्तांना जास्त असतो. कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यावेळी एक प्रोटीन तयार करते. यामुळे रक्तवाहिन्यांना धोका पोहोचतो.


हेही वाचा – कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा लहान मुलांना धोका, पेडियाट्रीक टास्क फोर्सची राज्यात स्थापना करणार


Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -