घरCORONA UPDATEभावाला वाचवलं नाही म्हणून कोरोना रुग्णाने केला डॉक्टरांवर हल्ला

भावाला वाचवलं नाही म्हणून कोरोना रुग्णाने केला डॉक्टरांवर हल्ला

Subscribe

हैदराबाद येथे बुधवारी एका ५६ वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूनंतर दुसर्‍या रूग्णाने आपलं मानसिक संतुलन गमावलं आणि डॉक्टरांवर हल्ला केला.

हैदराबादच्या गांधी रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरील आयसोलेशन वॉर्डमध्ये एका डॉक्टरवर हल्ला करण्यात आला आहे. स्वत: कोरोनाचा रुग्ण असलेल्या हल्लेखोरने आपल्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरवर हल्ला केला. ५६ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आला. अनेक आजार असल्यामुळे ५६ वर्षी रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान, त्याच्या भावालाही कोरोनाची लागण झाली होती. दोघेही एकाच रुग्णालयात उपचार घेत होते. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर दुसर्‍या रूग्णाने आपलं मानसिक संतुलन गमावलं आणि डॉक्टरांवर हल्ला केला. शिवाय रुग्णालयाची एक खिडकीही तोडली. डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या कोरोनाच्या रूग्णाविरूद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. हैदराबादचे पोलिस आयुक्त यांनी आणखी एक डीसीपी तैनात केला आहे.


हेही वाचा – तबलीगी जमातमधील लोक क्वारंटाईन वार्डमध्ये डॉक्टरांवर थुंकले

- Advertisement -

दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस प्रमुख रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांवरील हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला. तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटेला राजेंदर यांनीही गांधी रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि हल्लेखोरांविरूद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले. “एका कुटुंबातील दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भावाचा मृत्यू झाल्यानंतर भावाने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरवात केली. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अशा घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्यास अनुमती देऊ शकत नाही. आम्ही हल्लेखोरांवर कठोर कारवाई करू. जर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत असतील तर आम्हाला त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे, असं तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटेला राजेंदर म्हणाले.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -