घरCORONA UPDATEदेशात कोरोनाचा कहर अजून सुरुच राहणार, पुन्हा उद्भवू शकते महामारी, केंद्राचा इशारा

देशात कोरोनाचा कहर अजून सुरुच राहणार, पुन्हा उद्भवू शकते महामारी, केंद्राचा इशारा

Subscribe

देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नसून विषाणू सर्वोच्च पातळी गाठू शकतो. त्यामुळे भारतात पुन्हा कोरोना महामारीची स्थिती निर्माण होईल असा इशारा केंद्रीय नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी.के.पॉल यांनी दिला आहे. यावर बोलताना डॉ. पॉल म्हणाले की, प्रत्येक राज्यांच्या मदतीने आरोग्याशी संबंधित यंत्रणा राष्ट्रीय पातळीवर मजबूत करावी लागेल. जेणेकरुन कोरोना विषाणूंपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलता येतील. डॉ. वी.के. पॉल म्हणाले की, हा आरोप चुकीचा आहे की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेविषयी सरकारला माहिती नव्हते. आम्ही सतत विविध माध्यमातून लोकांना कोरोना विषाणू आणखी वाढेल असा इशारा देत ​​होतो. आम्ही हेही सांगत होतो की, कोरोना विषाणूची दुसरी लाट येईल. सध्या देशात सीरो पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के आहे. त्यामुळे अजूनही ८० टक्के लोक कोरोना संसर्गाला बळी पडू शकतात.

विषाणूविरोधात लढा देण्याची गरज

डॉ. पॉल म्हणाले की, कोरोना विषाणू अद्यापही भारतातून गेला नसून इतर देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. १ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पॉल म्हणाले की, १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना स्पष्टपणे सांगितले होते की, कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात आली असून लोकांनी यात अस्वस्थ होऊ नये. त्याऐवजी विषाणूविरोधात लढा देण्याची गरज आहे. तसेच सुरक्षित राहणे आवश्यक आहे.

- Advertisement -

फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डॉ. वी.के. पॉल यांना विचारण्यात आले की, कोरोना विषाणू सर्वोच्च पातळीवर म्हणजेच पीकवर पोहोचला आहे का? यावर डॉ.पॉल म्हणाले की, अशी कोणतीही मॉडेलिंग सिस्टम नाही, ज्याच्या माध्यमातून विषाणू सर्वोच्च पातळीवर कधी येईल याचा अंदाज येऊ शकेल. कोरोना विषाणूच्या बदलत्या व्हेरियंटमुळे हे सांगणेही कठीण आहे. ही गोष्ट संपूर्ण जगाला माहित आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूची उच्च पातळी अद्याप येणे बाकी 

डॉ. पॉल म्हणाले की, कोरोना विषाणूची उच्च पातळी अद्याप येणे बाकी आहे. कारण हा विषाणू कोणत्याही वेळी त्याचे रैद्र रूप घेऊ शकतो. त्यामुळे देशभरात तयारी सुरू आहे. आरोग्य सुविधा वाढविण्यात येत आहेत. कंटेंनमेंट मॅजर्स घेतले जात आहेत. परंतु यासाठी लोकांना कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, जेणेकरून अधिकाधिक सुरक्षित राहता येईल. इतर देशांप्रमाणे भारतात भीतीचे वातावरण नव्हते. तर इतर देशांमध्ये कोरोना विषाणू बर्‍याचदा उच्च पातळीवर पोहोचला आहे. कारण हा साथीचा रोग असून कोणताही छोटासा आजार नाही. या आजाराची खास गोष्ट म्हणजे हा विषाणू आता संपूर्ण देशभरात पसरला आहे. हा विषाणू आता तो ग्रामीण भागातही पोहचला असून दुर्गम डोंगराळ राज्यात पसरत आहे.

१२ राज्यात १ लाखाहून अधिक कोरोनाची प्रकरणे

लसीकरण आणि कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यासाठी लोकांनी अधिकाधिक वेळ केंद्रीत केले पाहिजे. यावेळी उपस्थित आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची प्रकरणे आता कमी होत आहेत. तसेच पॉझिटिव्ह रेटही कमी होत आहे परंतु. गेल्या तीन दिवसांतही कोरोनाची प्रकरणे कमी झाली आहेत. परंतु अशी १० राज्ये आहेत जेथे कोरोना पॉझिटिव्ह रेट हा २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने चिंता व्यक्त होत आहे. १२ राज्यात १ लाखाहून अधिक कोरोनाची प्रकरणे आहेत. तर २४ राज्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रेट हा १५ टक्के आहे. गोवा, पुड्डुचेरी, पश्चिम बंगाल, कर्नाटक, हरियाणा, राजस्थान, चंडीगड, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दहा राज्यांमध्ये परिस्थिती बिकट आहे. कारण या राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रेट हा २५ टक्क्यांहून अधिक आहे. तर दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोना पॉझिटिव्ह रेटा हा २० टक्क्यांहून अधिक आहेत.


सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाविरोधात ट्विटरवर #BoycottRadhe चा ट्रेंड सुरु


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -