Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी यावर्षी फटाक्यांविना 'या' राज्यात साजरी केली जाणार दिवाळी

यावर्षी फटाक्यांविना ‘या’ राज्यात साजरी केली जाणार दिवाळी

Related Story

- Advertisement -

दिवाळी म्हटली की फटक्यांची आतिशबाजी आलीच. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीच फटक्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये फटाक्यांविना दिवाळी साजरी होणार आहे. कोरोना रुग्णांना होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन राजस्थानमध्ये दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आतिशबाजीवर बंदी लावली आहे. कोरोना आढावा बैठकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदीचा निर्णय घेतला आहे. फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूपासून कोरोनाबाधित रुग्णांना होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन बंदी घालण्यात आली आहे.

मुख्यमंत्री गहलोत यांनी राजस्थानमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर आणि फोडण्यावर बंदी घातली आहे. यामुळे यंदा राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच साजरी होणार आहे. तसेच यामुळे फटाके न वापरण्याचा नागरिकांना राज्य सरकारने आवाहन केले आहे.

- Advertisement -

यासंदर्भात अशोक गेहलोत यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, टफटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूपासून कोरोनाबाधित रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी प्रदेशात फटाके विक्री आणि आतिशबाजीवर बंद घालण्याचे, तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या आणि धूर सोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.ट

यावेळी त्यांनी इतर देशांमधील कोरोनाचा संदर्भ दिला. तेव्हा ते म्हणाले की, ‘जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेनसारख्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. तर काही देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील अशी परिस्थितीत निर्माण होऊन नये, म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे.’

- Advertisement -