घरCORONA UPDATECovid-19: कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना होतायत 'हे' गंभीर आजार, ऑक्सफर्डचा रिसर्च

Covid-19: कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना होतायत ‘हे’ गंभीर आजार, ऑक्सफर्डचा रिसर्च

Subscribe

देशासह जगभरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या नव्या स्ट्रेनचे गंभीर, घातक परिणाम सध्या कोरोनाबाधित रुग्णाला सहन करावे लागत आहेत. कोरोनाचा नव्या स्ट्रेनच विपरित परिणाम व्यक्तीचा संपूर्ण शरीरावर दिसून येत आहेत. कारण हा स्ट्रेन कोरोनाबाधितांंच्या फुफ्फुसावर आणि श्वसनाशी संबधित अवयवांवर हल्ला करत आहे. यात जर एखाद्या रुग्णास आधीपासूनच फुफ्फुस आणि श्वसनासंबंधीत आजार असल्यास त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. कोरोना या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णास आता न्यूरोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल आजारही होत आहेत.

याव्यतिरिक्त कोरोनाचा सामना करुन कोरोनामुक्त झाल्यानंतर एंग्जायटी आणि मूड स्विंग, फंगल इंफेक्शनच्या आजारांचाही सामना करावा लागत आहे. याबाबत ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटीने नवा रिसर्च जाहीर केला आहे. या रिसर्चनुसार, अनेक कोरोनामुक्त रुग्णांना मेंदूचे आजार होत असल्याचे पाहायला मिळतेय. यामुळे रुग्णाचा मेंदू आणि इतर अवयवांचे कार्य बिघडत आहे. याव्यतिरिक्त अनेक कोरोनामुक्त व्यक्तींना सायकोलॉजिकल डिस ऑर्डर यांसारखे मडू स्विंग्स आणि अशक्तपणा देखील जाणवत आहे. काही प्रकरणांमध्ये कोरोना व्हायरसमुळं व्यक्तीच्या मेंदूवर आणि नर्वस सिस्टिमवर परिणाम झाल्याचे समो आले. यामुळे रुग्णांना अनेक गंभीर आजार होत आहेत. त्यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. असे ऑक्सफर्डमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमधून सिद्ध झालं आहे.

- Advertisement -

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना होतायत ‘हे’ गंभीर आजार

१) गुलियम बेरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) : शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immune) नसांवर हल्ला करते. यामुळे एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा, अंग सुन्न पडणं आणि पॅरालिसिसचा धोका निर्माण होत आहे.

२) एन्सेफॅलोपॅथी किंवा मेंदूचे आजार (Encephalopathy) : कोरोनामुक्त झाल्यानंतर व्यक्तींना मेंदूचे विकार होत असल्याचे समोर येत आगे. यामध्ये व्यक्तीची मनोविकृती (Psychosis) आणि स्मरणशक्ती (Memory) कमी होत आहे.

- Advertisement -

३) इन्सेफेलायटिस (Encephalitis) : कोरोनातून बरं झाल्यानंतर न्सेफेलायटिसची समस्या उद्भवू शकते. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या मेंदूला सूज येते.

४) एंग्जायटी (Anxiety) : अनेकांना कोरोनामुक्त झाल्यानंतर मानसिक समस्या उद्भवू लागतात. यामध्ये मूड स्विंग्स आणि एंग्जायटीची समस्यांचा समावेश होतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेला व्यक्ती समाजात एकाकी आणि एकट्या पडल्यासारखे फील करत आहे.

५) रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) : पोस्ट कोविड एक गंभीर समस्या म्हणून सध्या समोर येत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या मेंदूमध्ये ब्लड क्लॉटिंग होऊ शकते. यामुळे स्ट्रोक होण्याचाही धोका उद्भवतो. अनेक कोरोना रुग्णांमध्ये ही समस्या पाहायला मिळते.

३३ टक्के नागरिकांना मानसिक आणि न्युरोलॉजिकल समस्या

कोरोनामुक्त झाल्यानंतर ६ महिन्यांचा कालावधीत ३३ टक्के नागरिकांना मानसिक आणि न्युरोलॉजिकल समस्या असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या रुग्णांमध्ये श्वासासंबंधित इतर संसर्ग असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत मानसिक आणि न्युरोलॉजिकल समस्या होण्याची शक्यता १६ टक्क्यांनी अधिक आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर स्ट्रोक,डिमेंशिया, मूड स्विग्स, अनिद्रा, ब्रेन हॅमरेज, इस्केमिक स्ट्रोक, एंग्जायटी डिसऑर्डरचा सामना करत आहेत. त्यासोबतच 24 टक्के लोक चिंता आणि मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत.

सर्वाधिक धोका कोणाला?

या आजारांचा सर्वाधिक धोका वृद्ध व्यक्ती, ह्रदय संबंधीत आजार असलेले, आणि न्युरोलॉजिकल समस्यांनी ग्रस्त नागरिकांना आहे. तसेच अॅलर्जी, अस्थमा, टीबी किंवा श्वसनाच्या विकारांचा सामना करत आहेत, त्यांच्यावरही कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रभाव दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची लागण झाल्यानंतर ज्या व्यक्तीला उपचारांसाठी व्हेंटिलेटर किंवा आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते त्यांना हे आजार होत असल्याचे या रिसर्चमधून समोर आले.


Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांपर्यंत वाढण्याची शक्यता


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -