घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनामुक्त रुग्णांना 'म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शन'चा धोका

Coronavirus : कोरोनामुक्त रुग्णांना ‘म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शन’चा धोका

Subscribe

दृष्टी कमी होण्याची अनेक प्रकरणे आलीत समोर

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शन झाल्याची अनेक प्रकरणे मुंबईतून समोर आली आहेत. मुंबईत दररोज २० पेक्षा अधिक रुग्णांना ‘म्यूकोर्मिकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग झाल्याचा तक्रारी समोर येत असल्याचे मत डॉक्टराकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये ‘म्यूकोर्मिकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. या आजारावर वेळेत उपचार न झाल्यास अंधत्व, अवयवांचे कार्य बिघडणे, शरीरातील ऊतींचे नुकसान आणि मृत्यूही होऊ शकतो असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

काय आहे म्यूकोर्मिकोसिस?

‘म्यूकोर्मिकोसिस’ म्हणजे एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना काही रुग्णांना हा आजार होत असल्याच समोर आले आहे. ‘म्यूकोर्मिकोसिसचा संसर्ग हा अतिशय जीवघेणा आहे. या रूग्णांची संख्या सध्या वाढताना दिसून येत आहे. विविध फंगल इन्फेक्शनवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी परळच्या ग्लोबल रूग्णालयात ‘म्यूकोर्मिकोसिस’ क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. ‘फंगल इन्फेक्शन’ वर उपचार करणारे मुंबईतील हे पहिले क्लिनिक ठरले आहे.

- Advertisement -

अर्धांगवायूचा धोका अधिक

नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे ईएनटी अँड ऑटोरिनोलेरिंगोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमोल पाटील यावर सांगतात की, औषधोत्पाचार घेत कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका निर्माण होत आहे. यात रुग्णांचा शरीरावर म्यूकोर्मिकोसिस या बुरशीजन्य संसर्ग होणे असामान्य नाही. जर या रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्यास हा बुरशीजन्य संसर्ग शरारीतील इतर भागावरही पसरतो. तसेच मेंदू किंवा फुफ्फुसांसारख्या अवयवांवरही संसर्गाचा परिणाम झाल्यास रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो.

दृष्टी कमी होण्याची अनेक प्रकरणे 

गेल्या वर्षपासून म्यूकोर्मिकोसिसची सुमारे १० ते १५ प्रकरणे समोर आली आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे ३० ते ५० वयोगटातील होती. यातील बहुतांश रुग्णांना कोरोना संसर्गाचा झाला होता तर सायनसचा आजार होता. दरम्यान यात म्यूकोर्मिकोसिस संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये दृष्टी कमी होणे आणि मेंदूमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. मागील वर्षाचा तुलनेत या संसर्गाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे या आजारावर संपूर्ण क्लिनिकल अभ्यासाची आवश्यकता करण्याची गरज आहे असेही डॉ. अमोल पाटील म्हणाले.

- Advertisement -

गेल्यावर्षीचा तुलनेत वाढ 

आर.एन. कूपर रूग्णालयाचे एक वरिष्ठ डॉक्टर सांगतात की, गेल्या ९ महिन्यात बुरशीजन्य संसर्गाची 25 पेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. कोरोनाबाधित रुग्ण यातून बरे होण्यासाठी अनेक स्टेरॉईट्सचे सेवन करतो. यात जर रुग्णास मधुमेहसारखे आजार असल्यास स्टेरॉईटसेच सेवन केल्याने रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. त्यामुळे रुग्णात म्यूकोर्मिकोसिस संसर्गाची वाढ होत आहे. दरम्यान मागील वर्षाचा तुलनेत या बुरशीजन्य आजारात ५० टक्के वाढ झाली आहे. तर २० टक्के रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या २ ते ३ टक्के रुग्ण या बुरशीजन्य आजारावर उपचार घेत आहेत. दरम्यान २०१८-१९ मध्ये अशा आजारांचा सामना करणाऱ्या १२ ते १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या, पण कोरोनानंतर २०२० मध्ये त्यांनी २० ते २५ प्रकरणे आढळली आहेत. तर २०२१ मध्ये यात वाढ झाली असून दिवसाला २५ रुग्ण आढळत आहेत.

दरम्यान वाराणसीतीसल ६५ वर्षीय एका रुग्णाला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता याचदरम्या त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. परंतु कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन आठवड्यानंतर म्यूकोर्मिकोसिस चा संसर्ग झाला. या संसर्गामुळे त्याची प्रकृती पूर्णपणे ठासळल्याने त्याला वाराणसीहून मुंबईत विमानाने आणण्यात आले. यावेळी त्याला म्यूकोर्मिकोसिस संसर्गाची गंभीर लक्षणे आढळली. हा संसर्ग रुग्णाचा मेंदू, डोळे आणि सायनसमध्ये पसरला होता त्य़ामुळे त्याला तात्काळ व्हेंटिलेटर लावून ऑपरेशन करण्यात आले, तसेच त्याला अँटी- फंगल इंफेक्शनची उच्च डोस देण्यात आली. मात्र उपचार सुरु असतानाच रुग्णाचा काही तासांनी मृत्यू झाला. असे ग्लोबल हॉस्पिटमधील कन्सल्टंट डॉ. मिलिंद नवलखे यांनी सांगितले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -