घरताज्या घडामोडीCovid-19 Second Wave: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १ कोटी भारतीय झाले बेरोजगार

Covid-19 Second Wave: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १ कोटी भारतीय झाले बेरोजगार

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील १ कोटींहून अधिक लोकं बेरोजगार झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या कोरोना काळाच्या सुरुवापासून ते आतापर्यंत ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (Centre for Monitoring Indian Economy (CMIE)) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी याबाबत सोमवारी माहिती दिली.

महेश व्यास यांनी पीटीआयशीसोबत बोलताना सांगितले की, ‘सर्वेक्षण संस्थेच्या मुल्यांकनानुसार मे महिन्यामध्ये बेरोजगारी दर १२ टक्के झाला, जो एप्रिलमध्ये ८ टक्के होता. याचा अर्थ यादरम्यान जवळपास १ कोटी भारतीयांनी नोकरी गमावली आहे. नोकरी जाण्याचे मुख्य कारण कोरोनाची दुसरी लाट आहे. ज्या लोकांची नोकरी गेली आहे, त्यांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. असंघटित क्षेत्रात नोकऱ्या वेगाने तयार होत आहे, परंतु संघटित क्षेत्रात चांगली नोकरी मिळण्यास वेळ लागत आहे. अर्थव्यवस्थेच्या सुरळीत कामकाजामुळे ही समस्या काही अंशी सुटण्याची अपेक्षा आहे. पण ते पूर्णतः होणार नाही.’

- Advertisement -

माहितीनुसार गेल्यावर्षी मे महिन्यात कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन लावल्यामुळे बेरोजगारी दर २३.५ टक्के झाला होता. काही तज्ज्ञांचे मत होते की, कोरोनाची दुसरी लाट शिगेली पोहोचली आहे आणि आता राज्यात हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत.

व्यास पुढे म्हणाले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ३ ते ४ टक्के बेरोजगारी दर सामान्य मानला जातो. हे असे सूचित करते की, परिस्थिती सुधारण्यास वेळ लागू शकते. सीएमआयने एप्रिलमध्ये १.७५ लाख कुटुंबांचे देशव्यापी सर्वेक्षण पूर्ण केले. गेल्या एका वर्षाच्या उत्पन्नासंदर्भात चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी फक्त ३ टक्के कुटुंबांचे उत्पन्न वाढले. तर ५५ टक्के लोकांचे उत्पन्न कमी झाले. सर्वेक्षणातील ४२ टक्के लोकं म्हणाले की, त्यांचे उत्पन्न गेल्या वर्षीसारखेच आहे. जर महागाईचा दर समायोजित केला गेला तर देशातील ९७ टक्के घरातील उत्पन्नाची परिस्थिती महामारीच्या काळात कमी झाली आहे, असा आमचा अंदाज आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus in india: दिलासादायक! देशात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; रिकव्हरी रेट ९२ टक्के पार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -