घरCORONA UPDATECoronavirus - 'ही' लक्षणं दिसत असतील तर त्वरीत व्हा 'होम क्वारंटाईन'!

Coronavirus – ‘ही’ लक्षणं दिसत असतील तर त्वरीत व्हा ‘होम क्वारंटाईन’!

Subscribe

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली गाईडलाईन

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. लॉकडाऊन सुरू असूनही देशात कोरोनारूग्णांची संख्या वाढत आहे. देशात २० हजारांच्यावर कोरोना रूग्ण आढळले आहे. तर ९०० हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनचे काही नियम जाहीर केले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होण्यास मदत होईल. कारण आत्तापर्यंत ज्यांना कोरोना झाला आहे आणि जे संशयीत आहेत अशांची सुविधा हॉस्पिटलमध्येच करण्यात येत होती. मात्र ज्या व्यक्तींना अगदी कमी कोरोनाची लक्षणं आहेत. त्यांच्यासाठी होम आयसोलेशनचा पर्याय काढला आहे.

तर तुम्ही होम आयसोलेट व्हा!

– जर कोणत्या व्यक्तीत कोरोनाची काही प्रमामात लक्षणं दिसली तर त्यांना होम आयसोलेसनचा सल्ला दिला जातो.

- Advertisement -

– घरात आयसोलेशनसाठी वेगळी आणि कुटुंबातील इतर लोकांसाठी वेगळी सुविधा असणे आवश्यक आहे.

– २४ तास एखादा व्यक्ती तुमच्याबरोबर असणे गरजेचे आहे जो हॉस्पिटलशी सतत संपर्कात राहू शकेल.

- Advertisement -

– डॉक्टारांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी होम क्वारंटाईन होणं गरजेचं आहे.

– त्याचबरोबर आरोग्य सेतू अप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे.


हे ही वाचा – ‘Honda From Home’ आता घरबसल्या बुक करा होंडाची कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -