घरताज्या घडामोडीCorona लागण झाल्यावर वास का येत नाही ? संशोधक म्हणतात...

Corona लागण झाल्यावर वास का येत नाही ? संशोधक म्हणतात…

Subscribe

covid-19 मुळे अनेक अशा नेहमीच्या व्हायरल इन्फेक्शनवर संशोधन सुरू झाले आहे, ज्या संसर्गाच्या बाबतीत आतापर्यंत नेहमीच दुर्लक्ष केले जायचे. वास न येणे, छोटे रक्ताचे क्लॉट निर्माण होणे, ह्दय आणि फुफ्फुसाला धोका निर्माण होणे यासारखी लक्षणे कोरोनाच्या निमित्ताने समोर आली. पण संसर्गाच्या आजारांमध्ये नवीन किंवा वेगळी आगळी अशी लक्षणे नव्हेत. अनेक रूग्णांमध्ये श्वसनाच्या आजारात तसेच व्हायरल इन्फेक्शनमध्ये अशा प्रकारची लक्षणे ही सामान्यपणे दिसून येतात, असे न्यू यॉर्क टाईम्सने एका वृत्तात स्पष्ट केले आहे. कोरोनाची लक्षणे ही इतर संसर्गजन्य आजारांच्या लक्षणांसारखीच लक्षणे आहेत. पण या लक्षणावर याआधी कधीच संशोधन झाले नाही. पण कोरोनामुळे अशा संशोधनासाठीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आता जगभरातील संशोधक आणि अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

संसर्गाचे लक्षण ठरतेय अनेकांच्या कुतुहलाचा विषय 

कोरोनाच्या महामारीच्या संकटात पहिल्यांदाच वास न येण्याची कारणे शोधण्यासाठी संशोधन सुरू झाले. पण याआधी वास न येणे या लक्षणाकडे कोणीही गंभीरतेने लक्ष द्यायचे नाही. पण आता या संशोधनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यासारख्या संशोधनाला निधी उपलब्ध करून देणाऱ्यांमध्येही आता वाढ झालेली आहे. या संशोधनासाठी अनेकांमध्ये उत्सुकता असल्याचे अमेरिकेतील फिलाडेल्फियाच्या एका रिसर्च एनजीओतील सहसंचालक असलेले डॅनिली रेड यांनी स्पष्ट केले. मॉनेल केमिकल सेंटरमध्ये डेनिली रेड हे सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत अशा विषयावरील संशोधनाला निधी देण्यासाठी कोणीच उत्सुक नसायचे. अनेक मोठ्या जर्नल किंवा निधी देणाऱ्या संस्थांना अशा विषयावरील संशोधनात कधीच रस नसायचा. पण आता मात्र अनेकांना अशा विषयावरील संशोधनात रस आला आहे, असे नेदरलॅण्डच्या ईरॅसमस विद्यापिठाचे संशोधक मार्को गोइजीनबिअर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ह्दयाचा स्नायू दुखणे (Inflamation of heart muscle) ज्याला मायोकार्डिटीस असेही म्हणतात. जगभरात १५ लाख लोकांना या समस्येने ग्रासलेले आहे. हे लक्षण कोरोनाच्या महत्वाच्या लक्षणापैकी एक असे लक्षण आहे. पण असे लक्षण कधीच गंभीरतेने अभ्यासले गेले नाही. अनेकदा एकच बाब सर्वसामान्यांमध्ये लक्षात घेण्यात येते, ती म्हणजे कोरोनामुळे ह्दयविकाराचा धोका असतो, असे ब्रिटीश कोलंबिया विद्यापिठाचे प्राध्यापक ब्रुस मॅकमॅनस यांनी स्पष्ट केले. तर फुफ्फुस डॅमेज होणे हे सर्वसामान्यपणे कोरोना रूग्णांच्या बाबतीत आढळले आहे. ही परिस्थिती कोरोनामुळेही आढळून येते असे निदर्शनास आले आहे. अनेकदा फुफ्फुस खराब होण्याचे प्रकार हे इतर व्हायरसमुळेही होतात.

अनेकदा फुफ्फुसाच्या दरम्यान रक्ताच्या गुठळ्या निर्माण होणे हेदेखील कोरोनाशी संबंधित असे लक्षण मानले जाते. पण हे लक्षण शीतज्वरामुळेही असू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. असे लक्षण तेव्हाचे दिसते, जेव्हा श्वसन प्रक्रियेच्या दरम्यान त्या तापाचा व्हायरस फुफ्फुसाच्या खालच्या बाजूला प्रभावित करू लागतो. अनेकांमध्ये रोग प्रतिकारक शक्तीमुळेही असे लक्षण समोर आले आहे, असे नेदरलॅण्डच्या ईरॅसमस विद्यापिठाचे मार्को गोयजेनिबर यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -