घरCORONA UPDATEकोरोनाचा काही तासात मिळणार रिपोर्ट, चाचणीही होणार केवळ २०० रूपयात!

कोरोनाचा काही तासात मिळणार रिपोर्ट, चाचणीही होणार केवळ २०० रूपयात!

Subscribe

कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे

देशात लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरू आहे. मात्र तरीही अद्याप कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं नाही. धारावी सारख्या दाट वस्ती असलेल्या भागात कोरोनाचा प्रसार सुरूच आहे. कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या करणं हा एकमेव उपाय कोरोनाला आळा घालण्यासाठी आहे. पण या कोरोनाच्या चाचण्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत. कोरोनाच्या चचाणीसाठी खासगी लॅबमध्ये ४,५०० शुल्क आकारले जाते. मात्र आता कोरोनाची चाचणी स्वत होणार आहे.

आता कमी पैशात कोरोनाचं निदान करणं शक्य होणार आहे. कारण वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) रिलायन्सच्या मदतीनं कोरोनाचं निदान करणारी किट विकसित करणार आहे. यासाठी दोघांमध्ये करारही झाला आहे.

- Advertisement -

आरटी-लॅम्प कोविड-१९ टेस्ट

कोविड १९ आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक अऍसिडवर आधारीत आहे. रूग्णांच्या घसातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचं प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झालं आहे,” असं परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी सांगितलं.

डॉ. शेखर सी. मांडे पुढे बोलताना म्हणाले की, आरटी – लॅम्ट टेस्ट ही खूप स्वस्त आहे. कारण त्यासाठी फारसा खर्च येत नाही. त्याचबरोबर चाचणीही जलद गतीने घेता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागात कोरोनाच्या चाचणीसाठी वापर केला जाऊ शकतो. ग्रामीण भागातही तातडीनं ही सेवा उपलब्ध होऊ शकते.  या नवीन टेस्टिंग किटमुळे चाचणीसाठी शंभर ते दोनशे खर्च येईल. त्याचबरोबर एका तासातच करोना चाचणीचा रिपोर्ट आपल्याला मिळू शकतो,” अशी माहिती मांडे यांनी दिली.

- Advertisement -

हे ही वाचा – रेल्वेचा भोंगळ कारभार, मजूर हैराण.. ३० तासाच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -