Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE तिसऱ्या लाटेचा फटका कोणत्या राज्यांना बसू शकतो ? ICMR चे स्पष्टीकरण

तिसऱ्या लाटेचा फटका कोणत्या राज्यांना बसू शकतो ? ICMR चे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान म्हणजे एप्रिल ते मे २०२१ दरम्यान कोरोनाचा ज्या प्रमाणात कहर होता, त्या तुलनेत आगामी कालावधीत येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव मात्र कमीच असेल, असा दावा इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या तज्ज्ञांनी केला आहे. एपिडेमिओलॉजी एण्ड कम्युनिकेबल डिझिज विभागाचे प्रमुख डॉ समीरन पंडा यांनी आएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेता येईल याबाबतचीही माहिती त्यांनी दिली आहे. तसेच नवीन म्यूटंटमुळे काय काळजी घेणे गरजेचे आहे, याबाबतचाही इशारा त्यांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेचा परिणाम कोणत्या राज्यात असणार तसेच नव्या म्युटंटचा संसर्ग कुठे होऊ शकतो याबाबतचाही खुलासा त्यांनी केला आहे. (Covid-19 third wave may impact lesser to states where vaccination completed claims ICMR’s chief scientist)

कोणत्या राज्यात तिसऱ्या लाटेचा परिणाम ?

याआधी एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत ज्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव होता, त्या तुलनेत तिसरी लाट ही सौम्य असेल असा अंदाज डॉ समीरन पंडा यांनी मांडला आहे. काही राज्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. रूग्णसंख्येतील वाढ ही नजीकच्या काळात येणाऱ्या लाटेची चिन्हे असतात, असेही ते म्हणाले. महामारीच्या काळात अशा प्रकारच्या लाटा येतच असतात. पण दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट तितकीशी प्रभावी नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली की, संपुर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. म्हणूनच गेल्या लाटेचा अभ्यास करत नजीकच्या काळात येणाऱ्या लाटांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. दुसऱ्या लाटेमध्ये दिल्ली, महाराष्ट्रासह जवळपास दहा राज्यांना फटका बसला होता. पण काही राज्यांना या लाटेचा परिणाम जाणवला नाही. तिसऱ्या लाटेमध्ये अशाच राज्यांमध्ये लाटेचा परिणाम असू शकतो, अशीही शक्यता त्यांनी वर्तवली. दुसऱ्या लाटेमध्येच मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या आढळल्यानेच तिसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या कमी राहील असा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम असणाऱ्या राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्यामुळेच ज्या राज्यात लसीकरणाचा वेग कमी आहे तसेच दुसऱ्या लाटेचा तडाखा न बसलेल्या राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम राहील असा अंदाज आहे.

नव्या व्हेरियंटचा प्रभाव किती ?

- Advertisement -

कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटमध्ये C.1.2 आणि MU हे दोन्ही व्हायरस भारतात कन्सर्न श्रेणीत गणले गेले आहेत. पण या दोन्ही व्हायरसला व्हेरीयंट ऑफ कन्सर्न म्हणणे सध्या खूपच घाईचे होईल. त्यामुळेच सद्यस्थितीला समाजात वाढणारा संसर्ग, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या, मृत्यूदर यासारख्या गोष्टींवरच सद्यस्थितीला लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. ही सगळी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे वाढीव संसर्गाची लक्षणे आहेत. त्यामुळेच अशा परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. देशात डेल्टाच्या रूग्णसंख्येत वाढ होते आहे ही माहिती खरी आहे. पण ही वाढ अतिशय संथ वेगाने होते आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्या व्हेरीयंटचा वेग हा राही राज्यात अधिक होता. पण आता लसीकरण वेगाने होत असल्याने या व्हेरीयंटचा परिणाम नेमका काय होतो याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

शाळा खुल्या कराव्यात का ?

देशात चौथ्या सेरॉलॉजिकल सर्वेक्षणानुसार जवळपास ५५ टक्के लहा मुलांमध्ये अॅन्टीबॉडिज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तुलनेत लहान मुले उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण हे अतिशय कमी आहे. त्यामुळेच शाळा खुल्या करण्यासाठी सध्या सुरक्षित वातावरण आहे. जर शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच पालकांचे लसीकरण झाले असेल तर लहान मुलांना शाळेत पाठवण्यास हरकत नाही. पण शाळेतील बसेसमध्ये तसेच शाळेत वर्गात गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.


- Advertisement -

हेही वाचा – ‘..मग मंदिरांना प्रोटोकॉल नाही का?; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवारांचा राज्य सरकारला सवाल’


 

- Advertisement -