देशात एकाबाजूला कोरोना रुग्णसंख्येत होत असली तरी मृत्यूची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ४ हजारांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ५७ हजार २९९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार १९४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ३ लाख ५७ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसचे आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत वाढणार मृत्यू संख्येबाबत चिंता व्यक्त केली. देशात ६ राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘१० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद ७ राज्यांमध्ये होत आहे. तर ६ राज्यांमध्ये ५ ते १० हजार दरम्यान रुग्णांची नोंद होत आहे. देशातील ६ राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.’
There are only 7 states that are reporting more than 10,000 cases & 6 states with 5,000-10,000 cases. 6 states are reporting a high number of deaths. These are Maharashtra, Karnataka, Tamil Nadu, UP, Punjab and Delhi: Lav Agarwal, Joint Secretary, Union Health Ministry#COVID19 pic.twitter.com/bNBMbkuP45
— ANI (@ANI) May 22, 2021
पुढे लव अग्रवाल यांनी सांगितले की, ‘९३ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर कमी होत आहे.’
There are more than 93 districts where declining case positivity is being noted: Lav Agarwal, Joint Secretary, Union Health Ministry
— ANI (@ANI) May 22, 2021
मृत्यूचे प्रमाण जास्त असणार ६ राज्यांमधील कोरोनाची परिस्थिती
राज्य रुग्णांची संख्या मृत्यूची संख्या कोरोनामुक्तांची संख्या सक्रिय रुग्ण
महाराष्ट्र ५५,२७,०९२ ८६,६१८ ५०,७०,८०१ ३,६७,१२१
कर्नाटक २३,६७,७४२ २४,२०७ १८,२९,२७६ ५,१४,२३८
तामिळनाडू १७,७०,९८८ १९,५९८ १४,७६,७६१ २,७४,६२९
उत्तर प्रदेश १६,५९,२१२ १८,७६० १५,३४,१७६ १,०६,२७६
पंजाब ५,२८,६७६ १२,८८८ ४,५२,३१८ ६३,४७०
दिल्ली १४,१५,२१९ २३,०१३ १३,६०,८९८ ३१,३०८